महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि सेंट झेवीयर्स कॉलेज, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत यशवंतराव चव्हाण सेंटर. मुंबई येथे झालेल्या पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित राहून पारितोषिक प्राप्त महाविद्यालय व संस्थाचा पालक मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी सन्मान केला. करियर कट्टा उपक्रमातील यशवंत शितोळे यांनी तयार केलेल्या म्युरलचा व सन्मानाचा विनम्रपणे स्वीकार केला. यावेळी उपस्थितांशी संवाद साधतांना, शासन स्तरावरील पाठबळ आणि सेंट झेवीयर्स कॉलेजसारख्या प्रतिष्ठित संस्थेचा सहभाग यामुळे या उपक्रमाची व्याप्ती वाढली आहे. आजचे पारितोषिक वितरण हे केवळ कौतुक नसून, भविष्यातील ‘विकसित महाराष्ट्र’ घडवण्यासाठी तरुणांना दिलेली एक ऊर्जा आहे असे पालकमंत्री डॉक्टर उदय सामान म्हणाले. हा उपक्रम विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक भक्कम व्यासपीठ ठरत आहे, असे प्रतिपादन डॉक्टर उदय सामंत यांनी केले
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि सेंट झेवीयर्स कॉलेज, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत यशवंतराव चव्हाण सेंटर. मुंबई येथे झालेल्या पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित राहून पारितोषिक प्राप्त महाविद्यालय व संस्थाचा पालक मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी सन्मान केला.
