रत्नागिरीमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी श्री. दीपक मोने यांची निवड

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी श्री. दीपक मोने यांची निवड

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी श्री. दीपक मोने यांची निवड

चिपळूण : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणारी तसेच विद्यार्थीहिताला प्राधान्य देणारी राज्यातील एक प्रभावी आणि मोठी संघटना आहे. या संघटनेच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी श्री. दीपक मोने यांची निवड झाल्याने शिक्षकवर्गासह विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

श्री. मोने यांनी यापूर्वी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा सचिव म्हणून अत्यंत यशस्वीपणे काम पाहिले आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत संघटनेच्या कार्याला नवी दिशा दिली. त्यांच्या कार्यशैलीमुळे शिक्षकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास आणि आदर निर्माण झाला आहे.

प्रशासकीय कामकाजाचा सखोल अभ्यास, उत्कृष्ट संघटन कौशल्य, नियोजनबद्ध कार्यपद्धती, सर्वांना विश्वासात घेऊन काम करून घेण्याची हातोटी तसेच प्रत्येकाशी प्रेमाने, आपुलकीने आणि आदराने वागण्याचा त्यांचा स्वभाव ही त्यांची जमेची बाजू मानली जाते.

संघटनेसाठी त्यांनी दिलेले मोलाचे योगदान, प्रदीर्घ अनुभव, नेतृत्वगुण आणि शिक्षकांप्रती असलेली बांधिलकी यांचा विचार करून त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संघटनेने त्यांच्यावर टाकलेला विश्वास ते निश्चितच सार्थ ठरवतील, असा विश्वास शिक्षकवर्ग आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

श्री. दीपक मोने यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मार्गी लागतील आणि संघटनेचे कार्य अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...