Uncategorizedमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवारी रत्नागिरीतील 3 उपकेंद्रांवर परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवारी रत्नागिरीतील 3 उपकेंद्रांवर परीक्षा

रत्नागिरी, दि. 31 (जिमाका) :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही रत्नागिरी तालुक्यातील गोगटे जोगळेकर महाविद्यालय लॉ कॉलेज, पटवर्धन हायस्कूल आणि फाटक हायस्कूल अशा तीन उपकेंद्रांवर होणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली.
या परीक्षेसाठी 1 हजार 196 उमेदवार परीक्षेस बसणार आहेत. त्यांच्या परीक्षेची बैठक व्यवस्था गोगटे जोगळेकर महाविद्यालय लॉ कॉलेज या उपकेंद्रावर RT001001 ते RT001360, पटवर्धन हायस्कूल येथे RT002001 ते RT002360 आणि फाटक हायस्कूल येथे RT003001 ते RT003476 अशी करण्यात आली आहे.
आयोगामार्फत आयोजित परीक्षांमध्ये कॉपीचा, गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. अशा प्रकरणी संबंधितांवर फौजदारी व प्रशासकीय अशा दोन्ही स्वरुपाची कारवाई करण्यात आली आहे. परीक्षांकरिता आयोगाने कडक उपाययोजना केलेल्या आहेत. परीक्षा उपकेंद्रावर उमेदवाराची आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेली सेवा पुरवठादार संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात येणार आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Breaking News

ना. उदय सामंत ह्यांच्या उपस्थितीत विद्यार्थी गुणगौरव आणि मार्गदर्शन सोहळा संपन्न

रत्नागिरीच्या मातीत घडणाऱ्या आणि भविष्यात देशाचं नेतृत्व करू पाहणाऱ्या...

महाराष्ट्र भाजप चे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट-

प्रदेशाध्यक्षपदी निवडीनंतर रविंद्र चव्हाण यांची पंतप्रधान मोदींशी झाली पहिलीच...