लातूर जिल्ह्यातील शिवसेना, महिला आघाडी, युवासेना च्या सर्व जिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख यांची शिवसेना पक्ष समन्वयक, माजी. आमदार डॉ. राजन साळवी यांनी अवकाळी पाऊस व अतिवृष्टी मुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे झालेल्या नुकसानी बाबत आढावा बैठक घेऊन इथे असलेल्या अडचणी समजून घेऊन प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समवेत लातूर जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा घुगे यांची भेट घेवुन शेतीचे झालेले नुकसान, खरडून गेलेल्या जमिनीचे नुकसान, घरांचे तसेच जनावरांचे झालेले नुकसान, शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे, ICICI LOMBARD पीक विमा कंपनी बाबत असलेल्या अडचणी तसेच विमा कंपनी शेतकऱ्यांना सहकार्य करत नाही तसेच नुकसानाची भरपाई प्रक्रिया मध्ये विमा कंपनी गैरप्रकार करत आहे अशा तक्रारी, गेली 2/3 दिवस E-kyc यंत्रणा बंद आहे, फार्मर ID मुळे येणाऱ्या अडचणी अशा विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावर जिल्हाधिकारी यांनी सकारात्मकता दाखवून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही असे आश्वस्त केले आहे तसेच पीक विमा कंपनीला योग्य त्या कठोर सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन दाने, शिवाजीराव माने, ॲड. ब्रम्हाजी केंद्रे, महिला जिल्हाप्रमुख जयश्री भुतेकर, अर्चना बिराजदार, युवासेना जिल्हाप्रमुख कुलदीप सूर्यवंशी, विजय कस्पटे, युवराज वंजारे, तालुकाप्रमुख, तालुकासंघटक, तसेच अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
