चिपळूणमान्सूनच्या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम ॲक्शन मोडवर..

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम ॲक्शन मोडवर..

अधिकाऱ्यांसोबत केली चिपळूण शहर व ग्रामीण भागातील पाहणी…

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर चिपळूण शहर व आजूबाजूच्या परिसरामध्ये आमदार श्री.शेखर निकम यांनी पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली.यावेळी तिथल्या परिस्थितीवर अधिकारी व नागरिकांशी चर्चा करून योग्य त्या उपाययोजना करून परिस्थिती पूर्वपदावर आणण्या संदर्भात सूचना देण्यात आल्या व त्या संदर्भात पुढील आठ दिवसात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.आमदार शेखर निकम यांनी अधिकाऱ्यांसोबत चिपळूण शहरातील पॉवर हाऊस,प्रांत ऑफीस,चिपळूण बी.एस.एन.एल ऑफिस, चिपळूण जिप्सी कॉर्नर,पेठमाप नाईक ब्रीज,मुरादपूर गणपती मंदिर येथील पाणी निचरा पाहणी केली.बहादूरशेखनाका येथील वाशिष्टी नदीवरील जुना ब्रीज व गणपती विसर्जन घाट पाहणी,एन्रॉन ब्रीज दुरुस्ती पाहणी,चिपळूण एस.टी.आगार येथील आगाराची नवीन उभारण्यात येणारी इमारत व पाणी निचरा पाहणी,वांगडे मोहल्ला येथील एस.टी.निवारा शेड मारणे व पाणी निचरा यांचीi पाहणी केली.त्याचबरोबर खेंड महालक्ष्मीनगर व कांगणेवाडी (दुर्गाआळी)येथील दरड कोसळणे संबंधीत भागाची व कामाची पाहणी केली.आमदार शेखर निकम यांनी पाहणी केलेल्या सर्व संबंधीत ठिकाणांच्या समस्या तातडीने सोडविण्याबाबत व उपाययोजना करण्याबाबत अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.यावेळी आ.शेखर निकम,शौकत मुकादम,जयंद्रथ खताते,तालुकाध्यक्ष नितीन ठसाले,समीर काझी,फैरोजा मोडक,राजा चव्हाण,जाहीर कुंडलिक,समीर जानवरकर, संतोष नलावडे,अधिकारी वर्ग मुख्याधिकारी श्री.विशाल भोसले, तहसीलदार प्रवीण लोकरे,उपअभियंता जलसंपदा विपुल खोत,डेपो मॅनेजर दीपक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.ऐरिकेशन व बी.एन.सी.विभागाचे अधिकारी,राष्ट्रीय महामार्ग अधिकारी,नगरपालिका अधिकारी,एस.टी.अधिकारी यांच्यासह चिपळूण शहराची पाहणी केली.

Breaking News