Home रत्नागिरी मिळंद राजापूर गावचे सुपुत्र माजी पंचायत समिती सदस्य श्री.बाजी विश्वासराव यांचा आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश

मिळंद राजापूर गावचे सुपुत्र माजी पंचायत समिती सदस्य श्री.बाजी विश्वासराव यांचा आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश

0
मिळंद राजापूर गावचे सुपुत्र माजी पंचायत समिती सदस्य श्री.बाजी विश्वासराव यांचा आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश

मिळंद राजापूर गावचे सुपुत्र माजी पंचायत समिती सदस्य श्री.बाजी विश्वासराव यांचा आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश-
👉 राजापूर तालुक्यातील मिळंद गावचे सुपुत्र तथा माजी पंचायत समिती सदस्य श्री. बाजी विश्वासराव यांनी आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असून स्थानिक पातळीवर शिवसेनेला मोठी ताकद मिळाल्याचे मानले जात आहे.
या कार्यक्रमाला तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार किरण सामंत यांनी श्री. बाजी विश्वासराव यांचे पक्षात स्वागत करताना त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा गौरव केला. “जनतेच्या प्रश्नांसाठी झटणारे कार्यकर्ते शिवसेनेला अधिक बळ देतात. बाजी विश्वासराव यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा फायदा निश्चितच पक्षाला होईल,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
श्री. बाजी विश्वासराव यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार आहे.”
गेल्या काही वर्षांत पंचायत समिती सदस्य म्हणून काम करताना श्री. विश्वासराव यांनी विविध विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांच्या या प्रवेशामुळे मिळंदसह परिसरातील अनेक कार्यकर्ते शिवसेनेकडे आकर्षित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रवेश सोहळ्यामुळे राजापूर तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची चिन्हे दिसत असून आगामी काळात शिवसेनेची ताकद अधिक वाढणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here