मुंबई येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पुणे व नाशिक येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या वेळी पुणे संपर्कमंत्री म्हणून राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत ह्यांनी नव प्रवेशितांचे मन:पूर्वक स्वागत केलं.
शिवसेना म्हणजे विश्वास, विकास आणि विजयी नेतृत्वाचं प्रतीक आहे. महायुतीच्या माध्यमातून आगामी निवडणुकांमध्ये आम्ही बाजी मारणार आहोत, याचा ठाम विश्वास यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी व्यक्त केला.