राज्यातील शासकीय कार्यालयात दाखल कराव्या लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रकासाठी जोडावं लागणार 5oo रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलं आहे.महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला असून निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी दिलेत.या निर्णयाने लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना दिलासा मिळणार आहे.यापुढे एका साध्या कागदावर सेल्फ अटेस्टेड अर्ज लिहून प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून मिळू शकणार आहे . दहावी बारावीचा निकालानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांचा या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रांसाठी लागणारा खर्च जवळपास 3 ते 4 हजार रुपयांचा असतो . या निर्णयामुळे आता हा खर्च वाचणार असून विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.जात पडताळणी प्रमाणपत्र,उत्पन्नाचा दाखला,रहिवासी प्रमाणपत्र,नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट,राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रासह इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे.या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देशही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत.या सर्व प्रमाणपत्रांना जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क आता जोडावे लागणार नाही.त्या ऐवजी एका साध्या कागदावर ‘सेल्फ अटेस्टेड ‘अर्ज लिहून ही प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून मिळवता येतील. या संबंधित फेब्रुवारी 9 रोजी राष्ट्रवादीचे प्रांतिक उपाध्यक्ष शौकत मुकादम यांनी पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपर रद्द व्हावा अशी मागणी केली होती.म्हणाले की,पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरसाठी संबंधितांना वेठीस धरू नये.शासन निर्णयाप्रमाणे बहुतांशी अर्ज प्रतिज्ञापत्रसंमतीपत्र काही दाखले हे दहा रुपयाचे तिकीट लावून अर्ज स्वीकारले गेले पाहिजेत.पाचशे रुपयांचे स्टॅम्प पेपर सर्वसामान्यांच्या माथी मारू नयेत.या नियमाची तातडीने अंमलबजावणही करावी,अशी मागणी मुकादम यांनी केली होती.यासंदर्भात मुकादम यांनी खासदार सुनीलजी तटकरे यांच्याकडे सुद्धा पाचशे रुपयांचा स्टॅम्प पेपर रद्द व्हावा यासंदर्भात संबंधित मंत्र्यांशी बोलून हा निर्णय रद्द करावा अशी मागणी केली होती.
© Copyright - Konkan24News. Website Design, Development & Maintain by SM Media. +91 96047 60330.