रत्नागिरीमुकुल माधव विद्यालयाच्या स्वरांनी घुमला देशभक्तीचा जयघोष

मुकुल माधव विद्यालयाच्या स्वरांनी घुमला देशभक्तीचा जयघोष

🇮🇳 मुकुल माधव विद्यालयाच्या स्वरांनी घुमला देशभक्तीचा जयघोष! 🏆

रत्नागिरी जिल्हास्तरीय देशभक्तीपर गायन स्पर्धेत मुकुल माधव विद्यालयाचा प्रथम क्रमांक!

रत्नागिरी : मुकुल माधव विद्यालयाने रत्नागिरी जिल्हास्तरीय देशभक्तीपर गायन स्पर्धेच्या १४ वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक पटकावत विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.

वीर सावरकर सभागृह, रत्नागिरी येथे लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत इयत्ता चौथी, पाचवी आणि सहावीतील विद्यार्थ्यांनी आपल्या दमदार गायनातून देशभक्तीची भावना प्रभावीपणे सादर केली.

विद्यार्थ्यांच्या सुरेल आणि उत्स्फूर्त सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकत विजेतेपदावर मोहोर उमटवली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दलचे पारितोषिक नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे आणि संपूर्ण मुकुल माधव विद्यालय परिवाराचे अभिनंदन करण्यात येत आहे.

🇮🇳 स्वर देशभक्तीचे… यश मुकुल माधव विद्यालयाचे! 🏆

Breaking News

MyStake Casino : Vérification & Sécurité

La confiance est primordiale lorsqu’on joue en ligne. Dans...

Πληρωμές & Δεσμεύσεις στο Spinsy casino

Οι κυβερνο βηματα στη διαδικτυακή ντόπια επιχείρηση έχουν εξελιχθεί,...