रत्नागिरीमुकुल माधव विद्यालयात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

मुकुल माधव विद्यालयात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

मुकुल माधव विद्यालयात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न–

👉रत्नागिरी पावस मार्गावरील लोकप्रिय आणि प्रसिद्ध मुकुल माधव विद्यालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (DLSA), रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक साक्षरता वाढविणे तसेच त्यांना त्यांचे हक्क, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे प्राचार्य श्री. रोहित देशपांडे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे फॅक्टरी मॅनेजर श्री. सागर चिवटे तसेच ॲड. सौ. रुची महाजनी यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक दिवाणी न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी श्री. आर. आर. पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. गावंड आणि ॲड. वस्ता यांनी विद्यार्थी व शिक्षकांना विविध कायदेविषयक बाबींवर मोलाचे मार्गदर्शन केले.
या मार्गदर्शनपर सत्रात कायदेविषयक जागरूकतेचे महत्त्व, संविधानिक मूल्ये, बालकांचे हक्क, सायबर सुरक्षा तसेच मोफत कायदेशीर मदत मिळविण्याच्या विविध तरतुदींबाबत माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कांसोबतच कर्तव्यांचीही जाणीव ठेवावी, कायद्याचा आदर करावा आणि सजग व जबाबदार नागरिक म्हणून समाजाच्या प्रगतीत सकारात्मक योगदान द्यावे, असे आवाहन मान्यवरांनी केले.
संवादात्मक स्वरूपात झालेल्या या सत्रामुळे विद्यार्थ्यांना न्याय, समानता आणि सामाजिक जबाबदारी या मूल्यांचे महत्त्व समजून घेण्याची संधी मिळाली. तसेच भारतीय न्यायव्यवस्था आणि कायद्यांविषयी विद्यार्थ्यांच्या मनात जागरूकता व आदर निर्माण होण्यास या उपक्रमामुळे मदत झाली.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी दिलेल्या बहुमोल मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. विद्यार्थ्यांना कायदेविषयक ज्ञान देऊन त्यांना सजग, सुजाण आणि जबाबदार नागरिक बनण्यासाठी प्रेरित करणारा हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...