शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी प्रवेश सुरू | नर्सरी ते इयत्ता १२ वीपर्यंत कोणतीही फी वाढ नाही
रत्नागिरी जिल्ह्यातील विश्वासार्ह शैक्षणिक संस्था मुकुल माधव विद्यालय व ज्युनियर कॉलेज आपला १५ वर्षांचा यशस्वी शैक्षणिक प्रवास अभिमानाने साजरा करत आहे. २०१० साली केवळ १५० विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही संस्था आज ५०० हून अधिक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत आहे.
इयत्ता १० वी व १२ वीचा १००% निकाल, आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाडमधील उल्लेखनीय यश आणि सिल्व्हरझोन फाउंडेशन, नवी दिल्ली यांचा परफॉर्मन्स एक्सलन्स अवॉर्ड हे संस्थेच्या गुणवत्तेचे ठळक उदाहरण आहे.
“Be Local, Go Global” या ब्रीदवाक्याला अनुसरून शाळेत जर्मन भाषा (८ वर्षांपासून) आणि संस्कृत (४ वर्षांपासून) शिकवली जाते. त्यासोबतच वरिष्ठ विद्यार्थ्यांसाठी टेलरिंगसारखे कौशल्याधारित शिक्षण सुरू करण्यात आले असून लवकरच व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा मानस आहे.
मुकुल माधव विद्यालय ही रत्नागिरीतील पहिली ग्रीन स्कूल असून ग्रीन स्कूल रँकिंगमध्ये भारतात ९ वा क्रमांक आणि कॉर्नेल विद्यापीठ, अमेरिका येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रतिनिधित्व मिळवले आहे.
कराटे (१४ वर्षांपासून), गायन व तबला (१० वर्षांपासून) तसेच क्रीडा, योग, नृत्य, रोबोटिक्स आदी सर्व उपक्रम मोफत उपलब्ध असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला जातो.
पालकांसाठी आनंदाची बातमी!
महागाई वाढत असताना देखील मुकुल माधव विद्यालयात नर्सरी ते इयत्ता १२ वीपर्यंत कोणत्याही वर्गाची फी वाढवलेली नाही. शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी फी मागील वर्षाप्रमाणेच राहणार आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षण, जागतिक संधी, मजबूत संस्कार आणि शून्य फी वाढ –
आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा!
प्रवेश सुरू आहेत – उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निवड!
