Modal title

महाराष्ट्रमेरा भारत महान-- Airstrike in Pakistan: आरंभ है प्रचंड!

मेरा भारत महान– Airstrike in Pakistan: आरंभ है प्रचंड!

हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तान हादरला, नियंत्रण रेषेवर उघडला तोफखाना, Army कडून चोख प्रत्युत्तर. पुन्हा एकदा भारताने दहशत वादाविरोधातील आपली निती स्पष्ट करत, जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या गुप्त ऑपरेशन अंतर्गत भारतीय वायुसेनेने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले.

 हल्ले रात्री 1:30 वाजता करण्यात आले आणि यामागचा उद्देश होता, दहशतवाद्यांचे लॉंचपॅड्स आणि शस्त्रास्त्र साठ्याच नाश करणे
बहावलपूर, कोटली आणि मुजफ्फराबादमध्ये मोठा हल्ला
सूत्रांच्या माहितीनुसार, मिराज-2000 आणि सुखोई-30 एमकेआय सारख्या अत्याधुनिक लढाऊ विमानांनी बहावलपूर, कोटली आणि मुजफ्फराबाद येथील टार्गेट्सवर अचूक हल्ले केले. हे भाग जैश-ए-मोहम्मद आणि लश्कर-ए-तोयबा यांसारख्या दहशतवादी संघटनांचे बालेकिल्ले मानले जात होते.
पाकिस्तानचा प्रतिउत्तर म्हणून एलओसीवर तोफखाना उघडला
भारतीय कारवाईनंतर पाकिस्ताननेही युद्धविरामाचा भंग करत पुंछ-राजौरी सेक्टरमधील भींबर गली भागात तोफेचा मारा केला. मात्र भारतीय लष्कराने संतुलित व चोख प्रत्युत्तर दिले असून, नियंत्रण रेषेवर सुरक्षेसाठी सगळी तयारी पूर्ण असल्याचे सैनिकी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
भारताची वायुसेना सज्ज
रक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारत-पाकिस्तान सीमेवरील सर्व वायु संरक्षण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी तातडीने प्रत्युत्तर देता येईल अशी तयारी करण्यात आली आहे.

Breaking News