रत्नागिरीमोसम ता. राजापूर गावाला जोडणाऱ्या पुलांचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते लोकार्पण

मोसम ता. राजापूर गावाला जोडणाऱ्या पुलांचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते लोकार्पण

मोसम ता. राजापूर गावाला जोडणाऱ्या पुलांचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते लोकार्पण

राजापूर : तालुक्यातील मोसम गावाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पुलांचे लोकार्पण राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किरण सामंत यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या पुलांमुळे ग्रामस्थांची अनेक वर्षांची गैरसोय दूर होणार असून गावाच्या दळणवळण व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे.
या लोकार्पण सोहळ्याला ग्रामस्थ, विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुलांचे उद्घाटन होताच ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला.
मोसम गाव परिसरात पावसाळ्याच्या काळात वाहतुकीच्या मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. नदी-नाल्यांवरील पाण्याची पातळी वाढल्याने गावाचा संपर्क तुटण्याची परिस्थिती अनेकदा निर्माण होत असे. विद्यार्थी, शेतकरी, महिला तसेच रुग्णवाहिकांना याचा मोठा फटका बसत होता. ग्रामस्थांकडून सुरक्षित आणि कायमस्वरूपी पुलांची मागणी सातत्याने करण्यात येत होती.
या प्रश्नाची दखल घेत आमदार किरण सामंत यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत निधी उपलब्ध करून दिला आणि पुलांची कामे मार्गी लावली. अखेर ही कामे पूर्णत्वास गेल्यानंतर ग्रामस्थांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे.
यावेळी बोलताना आमदार किरण सामंत म्हणाले की, “ग्रामीण भागाचा विकास हा मजबूत पायाभूत सुविधांवर अवलंबून असतो. गावागावात चांगले रस्ते आणि पूल निर्माण झाले तर नागरिकांचे जीवन अधिक सुलभ होते. मोसम गावातील नागरिकांना सुरक्षित आणि अखंड दळणवळण सुविधा मिळावी, यासाठी हे पूल उभारण्यात आले आहेत.”
ते पुढे म्हणाले, “मतदारसंघातील कोणतेही गाव विकासापासून वंचित राहू देणार नाही. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असून विकासकामांचा वेग कायम ठेवला जाईल.”
या पुलांमुळे मोसम गावासह परिसरातील वाड्या-वस्त्यांचा संपर्क अधिक मजबूत होणार असून शेतमाल वाहतूक, विद्यार्थ्यांचा प्रवास तसेच आपत्कालीन आरोग्य सेवा यांना मोठा फायदा होणार आहे. स्थानिक ग्रामस्थांनी या विकासकामाबद्दल आमदार किरण सामंत यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.
लोकार्पणानंतर आमदार किरण सामंत यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून परिसरातील विविध प्रश्न जाणून घेतले. विकासकामांच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन करणारे नेतृत्व म्हणून आमदार किरण सामंत यांच्याकडे नागरिक आशेने पाहत असल्याची भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाप्रसंगी सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता एम एस कुलकर्णी, कार्यकारी अभियंता अमोल ओठवणेकर, पंचायत समिती राजापूरच्या सभापती नंदनी कदम, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक नागले, सरपंच सर्वेश गुरव ,आरडीसी बँकेचे संचालक मुन्ना खामकर, जिल्हा परिषद सदस्य रमेश सूत, उपजिल्हाप्रमुख अशपाक हाजू, पंचायत समिती सदस्य भाग्यश्री लाड पंचायत समिती सदस्य प्रसाद मोहरकर नाना कोरगावकर दीपक बेंद्रे, भरत लाड, दामू शिंगाळे, प्रल्हाद नारकर विलास हरियाण यांच्यासहित गावातील गावकर मान्यवर ग्रामस्थ पक्षाचे सर्व पदाधिकारी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...