रत्नागिरीयोगेश कदम यांच्या बालेकिल्ल्यात मिलिंद नार्वेकरांची एंन्ट्री

योगेश कदम यांच्या बालेकिल्ल्यात मिलिंद नार्वेकरांची एंन्ट्री

कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर निवड

रत्नागिरी कोकणात दापोली मतदारसंघात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले व मातोश्रीवरती वावर असणारे विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांची थेट डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवरती निवड झाली आहे. या निवडीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकाअर्थाने शिवसेनेचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या बालेकिल्ल्यात मिलिंद नार्वेकरांची एंन्ट्री या नियुक्तीमुळे झाली आहे.

राज्यातल्या राजकीय भूकंपानंतर उद्धव ठाकरे यांचे निकडृती असलेले मिलिंद नार्वेकर चर्चेत आले होते त्याच दरम्यान उपमुख्यमंत्री व एकनाथ शिंदे व त्यांची भेटही घेतली होती त्यामुळे ते चर्चेत होते. मात्र आजही ते उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहेत. मिलिंद नार्वेकर यांचे यांचे सर्वपक्षीय संबंध उत्तम आहेत. कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवरती सत्ताधारी पक्षाच्या जवळच्या व्यक्तीची निवड करण्याची आजवरची प्रथा परंपरा राहिली आहे. मात्र यावेळी उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या नेत्याची कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर निवड झाल्याने हा विषय सध्या चर्चेचा ठरला आहे.

उपसचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई यांनी दिनांक २९ डिसेंबर, २०२५ रोजी अधिसुचीत केलेल्या पत्रान्वये मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोलीच्या कार्यकारी परिषदेचे सन्माननीय सदस्य म्हणून आपल्याला नामनिर्देशीत करण्यात आले होते त्यानंतर आचारसंहिता संपवताच ही नियुक्ती विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आली आहे. कृषी विद्यापीठ प्रशासनाकडून तशा स्वरूपाचा नियुक्तीचे पत्र नार्वेकर यांना देण्यात आले आहे. विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. आपले सदस्यत्व विद्यापीठाच्या प्रगतीस निश्चीतच लाभदायक ठरेल. आपल्या बहुमोल मार्गदर्शनाने विद्यापीठाच्या विकासासाठी नक्कीच हातभार लागेल याचा मला विश्वास आहे अशा स्वरूपाचा अभिनंदन पत्र कुलगुरू डॉक्टर संजय भावे यांनी मिलिंद नार्वेकर यांना दिले आहे.

या सगळ्या घडामोडीवर आता या निवडीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर हे सर्वपक्षीय नेत्यांमध्ये सलोख्याचे संबंध असलेले नेते आहेत. त्यामुळे शिवसेना नेते रामदास कदम व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदार संघातील बालेकिल्ल्यात असलेल्या कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर मिलिंद नार्वेकर यांची झालेली निवड ही सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Breaking News

चूना कोळवण तालुका राजापूर येथे विकासाला गती!

चूना कोळवण येथील गुरववाडी रस्ता तसेच पुरातन महाकाली मंदिर...