रत्नागिरीरत्नागिरीतील भगवती किल्ल्याजवळील सनसेट पॉईंट येथे एक मुलगी रेलिंगच्या बाहेर बसल्या मुळे...

रत्नागिरीतील भगवती किल्ल्याजवळील सनसेट पॉईंट येथे एक मुलगी रेलिंगच्या बाहेर बसल्या मुळे खाली पडल्याची खळबळजनक घटना घडली.

रत्नागिरीतील भगवती किल्ल्याजवळील सनसेट पॉईंट येथे एक मुलगी रेलिंगच्या बाहेर बसल्या मुळे खाली पडल्याची खळबळजनक घटना घडली. घटनेची माहिती मिळताच राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री
ना. उदय सामंत ह्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रशासनाला आवश्यक सूचना त्या केल्या.
पावसाळ्याचे दिवस असून देखील धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे प्रशासनाकडून वारंवार सांगितले जात आहे. मात्र काही पर्यटक सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत. नागरिक आणि पर्यटकांना विनंती – आपल्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्याने कोणत्याही धोकादायक ठिकाणी जाणे टाळा. प्रशासना च्या सूचना पाळा. आपली एक चुकीची कृती मोठ्या अपघातास कारणीभूत ठरू शकते, असे आवाहन ना. उदय सामंत ह्यांनी केले.

Breaking News