रत्नागिरीरत्नागिरीतील मनसे कार्यकर्त्यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उप प्रादेशिक अधिकारी कार्यालयावर धडक--

रत्नागिरीतील मनसे कार्यकर्त्यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उप प्रादेशिक अधिकारी कार्यालयावर धडक–

रत्नागिरी शहरातील आणि एम आय डी सी परिसरातील प्रदूषणाबाबत मांडल्या व्यथा–

रत्नागिरी प्रतिनिधी: –
रत्नागिरीतील मनसे पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी कार्यालयावर धडक देऊन संबंधित अधिकाऱ्यां समोर विविध प्रश्न उपस्थित केले. रत्नागिरी एमआयडीसी परिसरातील काही कंपन्या प्रदूषित पाणी खाडी समुद्रामध्ये सोडत असून यामुळे उत्पादनात घट होत असल्याचे निदर्शनास आले असून या कंपन्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने कारवाई कधी करण्यात येणार असा सवाल उपस्थित केला. प्रमाणे रत्नागिरी नगर परिषदेच्या हद्दीतील काही गटारांमधून प्रदूषित पाणी मांडवी खाडी समुद्रामध्ये सोडण्यात येत असून नगरपरिषदेवर काय कारवाई करणार असा सवाल उपस्थित केला. रत्नागिरी एमआयडीसी मध्ये स्वतःची प्रदूषित पाणी स्वच्छ करण्याची यंत्रणा नसल्यामुळे अनेक कंपन्या प्रदूषित पाणी खाडी समुद्रात सोडत आहेत त्यामुळे एमआयडीसी विभागाला कशाप्रकारे सूचना देण्यात येणार असाही सवाल उपस्थित करण्यात आला. त्याचप्रमाणे लांजा तालुक्यामध्ये काही भागांमध्ये स्टोन क्रशर उभारण्यात आली असून यामुळे गावातल्या जनतेला मनस्ताप होत असल्याची तक्रार मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी उपस्थित केला.

Breaking News