२२ जानेवारीला गुरुदेव श्री श्री रविशंकरजींच्या सान्निध्यात पार पडणार
‘भक्ती उत्सव’!
कोकणभूमीला पुन्हा एकदा अध्यात्मिक ऊर्जेचा स्पर्श लाभणार असून, गुरुवार दि.२२ जानेवारी २०२६ रोजी जागतिक शांततेचे दूत गुरुदेव श्री श्री रविशंकरजी रत्नागिरीत दाखल होत आहेत.
त्यांच्या पवित्र उपस्थितीत‘भक्ती उत्सव’हा भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती एडवोकेट
सौ.जया सामंत यांनी दिली आहे. रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ही एडव्होकेट जया सामंत यांनी केले आहे.
त्यांनी सांगितले की, प्राणायाम,ध्यान, योग आणि भारतीय संस्कृतीच्या अमूल्य मूल्यांचा जागतिक स्तरावर प्रसार करणारे गुरुदेव श्री श्री रविशंकरजी हे कोट्यावधी लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणत आहेत.
सुदर्शन क्रिया या अनोख्या श्वसनतंत्राच्या माध्यमातून त्यांनी तणावमुक्त जीवनाचा मार्ग दाखवला असून,अनेक देशांतील संघर्ष,युद्धजन्य परिस्थितीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
तसेच,राममंदिर सारख्या राष्ट्रीय प्रश्नांमध्ये त्यांनी समन्वयाची भूमिका घेत समाजात सौदार्य चा संदेश दिला.
रत्नागिरी सारख्या निसर्गसंपन्न, सांस्कृतिक व ऐतिहासिक शहरात गुरुदेवांचे आगमन ही अभिमानाची बाब असून,या निमित्ताने शहराच्या आध्यात्मिक ओळखीत नवा अध्याय लिहिला जाणार आहे.
भक्ती उत्सव कार्यक्रम तपशील
दिनांक:गुरुवार,२२ जानेवारी २०२६
वेळ:सायं. ५.०० वाजता,गोगटे–जोगळेकर कॉलेज मैदान, रत्नागिरी.
ज्ञान,ध्यान आणि भजन-सत्संग यांचा भक्तीमय संगम असलेल्या या उत्सवात स्वतः गुरुदेव श्री श्री रविशंकरजी सर्वांना मार्गदर्शन व आशीर्वाद देणार आहेत. रत्नागिरीकरांसाठी हा अनुभव आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरणार आहे.
पत्रकार परिषदेला आर्ट ऑफ लिव्हिंग च्या
सौ.विनीता गोखले, सौ.भुवना महागावकर,
श्री.निलेश मिरजकर
जिल्हा समन्वयक श्री.प्रविण डोंगरे सौ.प्राची देशपांडे, ॲड.प्राची जोशी, श्री.राजेश भुर्के,
सौ.श्वेता भट आणि
श्री.ओंकार फडके उपस्थित होते.
आर्ट ऑफ लिव्हिंग,रत्नागिरीच्या वतीने सर्व नागरिकांना सहकुटुंब या ऐतिहासिक ‘भक्ती उत्सवात’सहभागी होण्याचे आवाहन एडहोकेट जया सामंत यांनी केले आहे.
