रत्नागिरीरत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, रत्नागिरी या शैक्षणिक - सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेच्या...

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, रत्नागिरी या शैक्षणिक – सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेच्या प्रथम महिला कार्याध्यक्ष, शिक्षणतज्ञ श्रीमती.शिल्पाताई शशिकांत पटवर्धन (पूर्वाश्रमीच्या कु. कांचन करमरकर, मिरज) यांचा आज वाढदिवस

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, रत्नागिरी या शैक्षणिक – सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेच्या प्रथम महिला कार्याध्यक्ष, शिक्षणतज्ञ श्रीमती.शिल्पाताई शशिकांत पटवर्धन (पूर्वाश्रमीच्या कु. कांचन करमरकर, मिरज) यांचा आज वाढदिवस.

शिल्पाताई यांचा जन्म मिरजचा. शिक्षण मिरज येथून पूर्ण झाले आहे. रत्नागिरीतील शशिकांत पटवर्धन यांचेसोबत विवाहानंतर त्या रत्नागिरीत आल्या. पटवर्धन कुटुंब हे रत्नागिरीतील हाॅटेल- आंबा – डेअरी व्यवसायातील प्रसिद्ध कुटुंब. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर समर्थक. त्यामुळे समाजातील विविध क्षेत्रातील लोकांशी संपर्क यायचा. त्यातच सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड शिल्पाताईंना होती. आधी रत्नागिरीत जनसंघ व त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे काम करत आहेत. रत्नागिरी नगर परिषदेच्या 3-वेळा नगरसेवक राहिलेल्या शिल्पाताई आज भारतीय जनता पक्षाच्या महिला शाखेच्या राष्ट्रीय स्तरावर काम करतात. तसेच पक्षाच्या माध्यमातून अनेक पदे भूषविली आहेत.
रत्नागिरीतील प्रख्यात रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या पहिल्या महिला कार्याध्यक्ष बनण्याचा मान त्यांना प्राप्त झाला आहे. विविध सामाजिक संस्थांवर कार्यरत असणाऱ्या शिल्पाताई स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावसचेही अध्यक्षपद भूषवित आहेत.
आणि हे सर्व घरचे व्याप सांभाळून. उत्तम योगपटू म्हणूनही त्यांची ओळख आहे. संस्थांच्या कामानिमित्त अनेक ठिकाणी त्या जात असतात.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कामकाजात गेली 20-22 वर्षे सक्रिय सहभाग घेत आहेत. महाराष्ट्रातील पहिले इंग्लिश मिडीयम गुरूकुल स्कूल रत्नागिरीत त्यांच्याच पुढाकाराने सुरू झाले आहे. संस्थेच्या विविध उपक्रमांसाठी वेळोवेळी निधी जमविण्याचे कामही शिल्पाताई विविध स्त्रोत वापरून यशस्वीपणे करत आहेत. त्यापैकी उल्लेखनीय –
■ खासदार लता मंगेशकर यांच्या निधीतून गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या वाचनालयासाठी 25 लाखाचा निधी.
■ बाळासाहेब आपटे यांच्या खासदार निधीतून अनेक संस्थाना निधी उपलब्ध करून दिला.
■ रा. भा. शिर्के प्रशाला या शाळेतील विकास कामांसाठी 20 कोटी रुपये देणगी दाखल मंजूर आणले.

सामाजिक क्षेत्रातील कार्याविषयी –
□भारत सरकारच्या केंद्रीय दूरसंचार निगमच्या सल्लागार समितीच्या 06 – वर्षे माजी सदस्या.
□ कोषाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा महिला साहित्य संमेलन द्वारा – कोकण मराठी साहित्य परिषद
□ सामाजिक व पर्यावरण संतुलन क्षेत्रात काम करणाऱ्या ” आसमंत ” या संस्थेच्या संचालक.
□ आम्ही उद्योगिनी या महिलांना उद्यमशील बनविणाऱ्या राज्यस्तरीय संस्थेच्था रत्नागिरीतील सदस्या.
□ भाजपा महिला मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणीचा अहवाल ” आवाहन ” या हिंदी विशेषांकाचे उपसंपादक पद भूषविले तसेच माहितीपूर्ण लेख आणि कवितांचे लेखन.
□ बालकल्याण निधीतून कमलाबाई विसपुते वर्किंग वुमन होस्टेलसाठी एक कोटीचा निधी उपलब्ध करून दिला.

● इतर वैशिट्यपूर्ण सहभाग –
□ महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान कबड्डी खेळात सांगली जिल्ह्याचे कप्तानपद.
□ कबड्डीमध्ये युनिव्हर्सिटी प्लेयर म्हणून निवड.
□ योगासन, सूर्यनमस्कार, लांब उडी, टेबल टेनिस, स्विमिंग, बॅडमिंटन, गोळाफेक, खोखो इ . क्रीडाप्रकारात तालुकास्तरीय ते राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग व सुयश.
□ कथाकथन, कविता, लेखन साहित्य प्रकारात विविध स्पर्धेत सहभाग व सुयश.
□ 1973 इराण येथे झालेल्या सातव्या आंतरराष्ट्रीय महिला शारीरिक शिक्षण परिषेदत योगासन व वेताचा मल्लखांब यासाठी भारताचे प्रतिनिधित्व.
□ LIC of India कडून अमेरिका येथे विमा प्रतिनिधींसाठी आयोजित मिलियन डॉलर राऊंड टेबल काॅन्फरन्ससाठी 03 – वेळा निवड व सहभाग.

● विविध पुरस्कार व सत्कार –
■ कोकण मराठी साहित्य परिषद कार्यकर्ता पुरस्कार
■ LIC of India कडून विमा भूषण पुरस्कार
■ मनोरुग्णालय संस्था पुणे यांचा स्वयंसिद्धा पुरस्कार.
■ भगिनी मंडळ, रत्नागिरी यांचेकडून नवदुर्गा पुरस्कार.
■ मा. लालकृष्ण अडवाणी, कै. बाळासाहेब आपटे, श्रीम. सुमित्राताई महाजन, नितीन गडकरी, श्रीपादजी नाईक, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा या राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांकडून वेळोवेळी सत्कार.

” आमचे नवरंगी कर्तृत्व ” या कार्यक्रमात हिंदू महिला सभेकडून मार्च, 2025 मध्ये शिल्पाताई व त्यांच्या बहिणींचा सत्कार करण्यात आला.

शिल्पाताईंना वाढदिवसाच्या रत्नागिरी मीडिया परिवाराकडून तसेच वैयक्तिक माझ्या परिवाराकडून अनेक शुभेच्छा

माहिती संकलन – दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी.

Breaking News

शेतकऱ्यांवर आली टँकर ने शेतात पाणी मारण्याची वेळ

शेतकऱ्यांवर आली टँकर ने शेतात पाणी मारण्याची वेळ --...

गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेले संभाजीनगरचे ५ जण समुद्रात बुडाले, शोधकार्य सुरू

गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेले संभाजीनगरचे ५ जण समुद्रात बुडाले,...