रत्नागिरीरत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या पी.जी. अभ्यंकर कला व वाणिज्य आणि आर.बी. कुळकर्णी विज्ञान...

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या पी.जी. अभ्यंकर कला व वाणिज्य आणि आर.बी. कुळकर्णी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा भव्य उद्घाटन सोहळा खातू नाट्यमंदिरात पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या पी.जी. अभ्यंकर कला व वाणिज्य आणि आर.बी. कुळकर्णी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा भव्य उद्घाटन सोहळा खातू नाट्यमंदिरात पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. ज्या महाविद्यालयाचा मी माजी विद्यार्थी आहे, तिथेच आज ‘प्रमुख पाहुणा’ म्हणून या ऐतिहासिक क्षणी उपस्थित राहता आले, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. असे मत पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केले आणि शुभेच्छा दिल्या..यावेळी ५० वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या या संस्थेच्या कार्याची माहिती देणारा माहितीपटही दाखविण्यात आला.
रत्नागिरी जिल्हा शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित होत असून, त्यामध्ये अशा अनुभवी संस्थांचा मोलाचा हातभार आहे. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयाचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यामध्ये मोठा वाटा आहे. या महाविद्यालयाने केवळ पदव्या देण्याचे काम न करता सुसंस्कृत आणि गुणवंत पिढी घडवली असल्याचे यावेळी उपस्थितांशी संवाद साधतांना पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी नमूद केले.
या सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष तथा आजीव सभासद महेश नाईक, कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन, उपाध्यक्ष ॲड.विलास पाटणे, मुकुंदराव जोशी, उपकार्याध्यक्ष विजयराव साखळकर, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, डॉ.मकरंद साखळकर, नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, तालुकाप्रमुख बाबूशेठ म्हाप, मुन्ना सुर्वे यांच्यासह या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...