रत्नागिरीरत्नागिरी जिल्हास्तरीय सल्लागार समिती बैठक (डीसीसी) व जिल्हास्तरीय समीक्षा समिती बैठक (डीएलआरसी)...

रत्नागिरी जिल्हास्तरीय सल्लागार समिती बैठक (डीसीसी) व जिल्हास्तरीय समीक्षा समिती बैठक (डीएलआरसी) सप्टेंबर समाप्त तिमाही बैठक  दि. 29.12.2025 रोजी दुपारी 04.00 वाजता मा. जिल्हाधिकारी श्री. मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

 रत्नागिरी जिल्हास्तरीय सल्लागार समिती बैठक (डीसीसी) व जिल्हास्तरीय समीक्षा समिती बैठक (डीएलआरसी) सप्टेंबर समाप्त तिमाही बैठक  दि. 29.12.2025 रोजी दुपारी 04.00 वाजता मा. जिल्हाधिकारी श्री. मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर बैठकीसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. वैदेही रानडे ,आरबीआय एलडीओ कु. बेनज़ीर शेख, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक श्री. दर्शन दत्ताराम कानसे, डीडीएम नाबार्ड श्री. महेश टिळेकर, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र श्री. अजिंक्य अजगेकर, कृषी अधीक्षक श्री. सदाफुले, सर्व विभाग प्रमुख व सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक यांच्या उपस्थितीत मा. जिल्हाधिकारी श्री. मनुज जिंदल यांनी बैठकीला संबोधित केले. सप्टेंबर सहामाहीमध्ये सर्व बँकांनी कृषी कर्ज वितरण, शैक्षणिक कर्ज वितरण, मुद्रा कर्ज वितरण यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत अतिशय चमकदार कामगिरी केली आहे याचे कौतुक व अभिनंदन मा. जिल्हाधिकारी साहेबांनी केले आहे.
              सर्व शासकीय विभागाने आपापल्या योजनांचा आढावा घेतला. यामध्ये भारतीय रिझर्व बँकेचे एलडीओ कु. बेनज़ीर शेख यांनीही अनेक विषयांवर आपले स्पष्टीकरण केले. यानंतर डीडीएम नाबार्ड श्री. टिळेकर यांनी एआयएफ योजनेचा आढावा घेतला. यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. वैदेही रानडे यांच्या हस्ते संभाव्य वित्तपुरवठा आराखडा (PLP) 2026 -27 चे अनावरण करण्यात आले. यामध्ये नाबार्डकडून रु. 5283.34 कोटींचा वित्त पुरवठा आराखडा जाहीर करण्यात आला. यामध्ये कृषी तसेच प्राथमिकता विभागाला करण्यात आलेल्या वित्तपुरवठा प्रगती यामध्ये पीक कर्ज वितरण प्रगती याचा आढावा घेण्यात आला. या आराखड्यात कृषी क्षेत्रासाठी रु. 2437.30 कोटी, सूक्ष्म व लघु (MSME) क्षेत्रासाठी रू. 1875.41 कोटी, इतर प्राथमिकता क्षेत्रासाठी (Other Priority sector) रू. 970.63 कोटी ची विभागणी करण्यात आली. असा एकूण रू. 5283.34 कोटींचा संभाव्य वित्तपुरवठा आराखडा (PLP) 2026 -27 जाहीर करण्यात आला.

Breaking News