रत्नागिरीरत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र...

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र फुणगुसला भेट देत केली पाहणी

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र फुणगुसला भेट देत केली पाहणी–
👉रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांनी संगमेश्वर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र फुणगुस येथे भेट देऊन आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला.
भेटी दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्राची माहिती घेण्यात आली. तसेच बाह्यरुग्ण विभाग (OPD) व आंतररुग्ण विभाग (IPD) मधील आरोग्य सेवांचे कामकाज, उपलब्ध औषधसाठ्याची तपासणी, जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या HPV लसीकरण कार्यक्रमाचा आढावा तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाची माहिती घेण्यात आली.
याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात सुरू असलेल्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक औषधसाठा, मनुष्यबळ, आरोग्य सेवा व आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सदैव सज्ज ठेवण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानाडे यांनी दिल्या.
यावेळी डॉ. लिंगायत, डॉ. आगरे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाज, रुग्णसेवा व विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समाधान व्यक्त करून पुढील काळातही गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.
– डॉ. अनिरुद्ध आठल्ये
जिल्हा आरोग्य अधिकारी,
जिल्हा परिषद रत्नागिरी

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...