रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील कुरुधुंडा येथे असलेल्या हजरत जैनुद्दीन पीर बाबांचा वार्षिक उर्स पारंपारिक पद्धतीने आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला..
बाबांच्या दर्शनासाठी हिंदू मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती.. हजरत जैनुद्दीन पीर बाबांचा दर्गा राष्ट्रीय एकात्मते साठी प्रसिद्ध असल्याने दरवर्षी बाबांचा वार्षिक उर्स उत्साहाने साजरा केला जातो.. या वेळी प्रसिद्ध कव्वाल चांद अफजल कादरी यांच्या कवाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
