या बैठकीला उपस्थित राहून रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरी जिल्ह्यात सुरु असणाऱ्या सदस्यता नोंदणीचा आढावा घेतला.
रत्नागिरी जिल्ह्यात सुरु असणारी सदस्यता नोंदणीला अधिक गती देण्याच्या दृष्टीने प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने घराघरात जाऊन जनतेशी संवाद साधत त्यांना भाजपा परिवारात सामील करून घ्यावे, असे आवाहन यावेळी रवींद्र चव्हाण यांनी केले.
या प्रसंगी माजी आमदार विनय नातू, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, कोकण संघटन मंत्री शैलेंद्र दळवी आदी उपस्थित होते.