आता अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी घरबसल्या काही मिनिटांतच स्वतःची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात – तेही मोबाईल 📱 वापरून आणि चेहराव्दारे पडताळणी 🤳 करून!
राज्य शासनाने NIC च्या सहकार्याने सुरू केलेल्या Mera E-KYC या विशेष ॲपद्वारे लाभार्थ्यांना रेशन दुकानावर न जाता घरीच ई-केवायसी करता येते.
✨ मुख्य वैशिष्ट्ये:
✅ मोबाईलद्वारे 📱 घरबसल्या केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध!
✅ चेहराव्दारे त्वरित पडताळणी (Face Authentication) 🤳
✅ लाभार्थी स्वतः, दुकानदार किंवा घरातील सदस्य केवायसी करू शकतो.
✅ आधार क्रमांक मोबाईलशी लिंक असणे आवश्यक आहे.
🛠️ ई-केवायसी प्रक्रिया (Step-by-Step मार्गदर्शन):
1️⃣ ही दोन ॲप्स आधी डाउनलोड करा:
🔗 Mera E-KYC App👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.facialauth
🔗 Aadhaar Face RD App👇
https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd
2️⃣ दोन्ही ॲप्स इन्स्टॉल करून आवश्यक परवानग्या द्याव्यात.
3️⃣ Mera E-KYC ॲप उघडा:
▪️ राज्य: महाराष्ट्र निवडा
▪️ आधार क्रमांक टाका
▪️ OTP टाका (आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर येईल)
▪️ Captcha भरा
4️⃣ चेहराव्दारे पडताळणी 🤳:
▪️ समोरचा कॅमेरा वापरून चेहरा स्कॅन करा
▪️ दुसऱ्याचे केवायसी करत असल्यास बॅक कॅमेरा वापरा
▪️ स्क्रीनवरील सूचनांप्रमाणे डोळ्यांची उघडझाप करा
5️⃣ चेहऱ्याच्या यशस्वी पडताळणीनंतर:
📟 लाभार्थ्याची माहिती रेशन दुकानातील E-PoS मशीनवर दिसू लागेल
📱 “E-KYC Status” मध्ये “Y” असल्यास प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
📢 विशेष सूचना – रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांसाठी:
🔹 आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 3 लाख लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप बाकी आहे.
🔹 31 जुलै पूर्वी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून कोणीही अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही.
🔹 ज्यांना मोबाईलवरून ई-केवायसी करता येत नसेल त्यांनी जवळच्या रेशन दुकानात जाऊन 📟 E-PoS मशीनवरून केवायसी पूर्ण करावी.
🔹 रत्नागिरी जिल्ह्याबाहेर🚶♂️पण महाराष्ट्रातच इतर जिल्ह्यांमध्ये वास्तव्यास असलेले लाभार्थी देखील तेथील जवळच्या स्थानिक रेशन दुकानात जाऊन आपली केवायसी करू शकतात.
🔹 मुंबईत, ठाणे, पुणे व इतर शहरात असलेले🚶♂️लाभार्थी देखील मोबाईलवरून किंवा जवळच्या शिधावाटप / रास्त भाव दुकानात जाऊन स्वतःची ई-केवायसी सहज पूर्ण करू शकतात.
👶 पाच वर्षांखालील व पाच वर्षानंतरच्या मुलांसाठी सूचना:
🔸 सध्या 5 वर्षांखालील बालकांची ई-केवायसी आवश्यक नाही.
🔸 मात्र जेव्हा मूल 5 वर्ष पूर्ण करेल, तेव्हा:
▪️ त्याचे आधार कार्ड अपडेट करावे
▪️ त्यावर मोबाईल नंबर लिंक करावा
▪️ त्यानंतरच त्या मुलाची ई-केवायसी Mera E-KYC App वापरून फेस ऑथेंटिकेशन 🤳 द्वारे पूर्ण करणे अनिवार्य आहे.
🔁 इतर राज्यात स्थलांतरित लाभार्थ्यांसाठी:
🔹 महाराष्ट्राबाहेर वास्तव्यास असलेल्या लाभार्थ्यांनी स्थानिक रेशन दुकानातील 📟 E-PoS मशीनवर “IMPDS KYC” पर्याय वापरून केवायसी पूर्ण करावी.
🔹 महाराष्ट्राबाहेरील लाभार्थ्यांनी देखील Mera E-KYC ॲपमध्ये स्वतः ज्या राज्यात वास्तव्यास आहेत (उदा. मध्यप्रदेश, छत्तीसगड, गोवा इत्यादी) ते राज्य सिलेक्ट करून आधार क्रमांक टाकल्यास मोबाईलद्वारेच फेस ऑथेंटिकेशन करून ई-केवायसी पूर्ण करता येते.
👤✅ अन्नधान्याचा लाभ चालू राहणेकामी 100% लाभार्थ्यांची E-KYC आवश्यक आहे.🆔🧾📲
🔴 * सप्टेंबर 2025 चे धान्यासाठी ज्या लाभार्थ्यांची eKYC पूर्ण नसेल, त्यांना ❌ No eKYC; No Ration या तत्त्वानुसार धान्य मिळण्यात अडचण येऊ शकते.”* 🛑
👥 जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकानदारांनी शिधापत्रिकाधारकांना मार्गदर्शन करून शक्य तेवढ्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांची ई-केवायसी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून कोणताही पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहू नये.
📢 ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या शेजाऱ्यांना, नातेवाईकांना, गावातील इतर लाभार्थ्यांपर्यंत जरूर पोहोचवा – जेणेकरून कुणीही आपल्या हक्काच्या अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही.
🌾 शाश्वत अन्नपूर्णतेकडून सर्वस्पर्शी अन्नशाश्वततेकडे!🌾
रोहिणी रजपूत, (प्र. जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी)