संपूर्ण कोकणातील सर्वात जुनी कर्ला मच्छिमार संस्था या संस्थेची 2025-2029 कार्यकारी मंडळाची निवड झाल्यावर त्या मधून अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी ची आयोजित करण्यात आली होती, निवडणूक निर्णय अधिकारी,श्री.राणे यांनी 12 वाजता मतदान प्रक्रिये सुरवात केली,अध्यक्ष पदा साठी दोन अर्ज आले नदीम सोलकर व सलाउद्दीन म्हसकर,व उपाध्यक्ष पदा साठी अझीम वस्ता यांचा एकमेव अर्ज यांचा आल्यामुळे उपाध्यक्ष पदी अझीम वस्ता निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली,आणि अध्यक्ष पदा साठी दोन अर्ज आल्यामुळे गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्यात आली,9 पैकी 5 मते नदीम सोलकर यांना मिळाली,व सलाउद्दीन म्हसकर यांना 4 मते मिळाली, या अटीतटीच्या निवडणुकीत नदीम सोलकर यांचा विजय झाला असता मच्छिमार समाजाच्या कडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. *नदीम सोलकर हे हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांच्या या निवडी बद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.. नदीम सोलकर यांनी या पुर्वी ही चेअरमन म्हणून काम केले असल्याने त्यांना याचा चांगला अनुभव आहे.त्यामुळे ते चेअरमन म्हणून पुन्हा उत्तम प्रकारे काम करू शकतात.. कोकण 24 तास न्यूज चॅनल तर्फे नवनिर्वाचित चेअरमन नदीम सोलकर यांना मनापासून शुभेच्छा आणि अभिनंदन
रत्नागिरी तालुक्यातील कर्ला मच्छिमार सोसायटी च्या अध्यक्ष पदी नदीम सोलकर तर उपाध्यक्ष पदी अझीम वस्ता यांची निवड
