रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव घवाळीवाडी येथील लीना पॉवरटेक कंपनी ने बसविलेल्या DP ला स्पार्किंग ने आग लागली आहे. दरम्यान ही आग स्पार्किंग ने लागली कि अन्य काही कारण आहे याचा शोध घेतला जात आहे..
लिना पावरटेक कंपनी ने रत्नागिरी तालुक्यातील अनेक भागात भुमीगत विज वाहीण्या टाकण्याचे काम केले आहे.परंतु त्यांच्या कामाला दर्जा नसल्याने अनेकांनी तक्रारी केल्या आहेत.. शिरगांव ग्रामपंचायत च्या मागील ग्रामसभेत ही अनेक ग्रामस्थांनी लिना पावरटेक कंपनी च्या कामा बद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली होती..