रत्नागिरीरत्नागिरी दक्षिण जिल्हा कार्यकारिणीची पहिली बैठक उत्साहात पडली पार

रत्नागिरी दक्षिण जिल्हा कार्यकारिणीची पहिली बैठक उत्साहात पडली पार

रत्नागिरी दक्षिण जिल्हा कार्यकारिणीची पहिली बैठक उत्साहात पडली पार

माजी आमदार, प्रदेश सरचिटणीस सुनिल राणे यांची प्रमुख उपस्थिती

जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या अभिनंदनाचा ठराव; जिल्ह्याच्या वतीने सत्कार-

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिण जिल्हा कार्यकारिणीची पहिली बैठक अंबर हॉल येथे माजी आमदार तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुनिल राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते सुनिल राणे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच प्रशांत यादव यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आणि रत्नागिरी दक्षिण जिल्ह्याच्या वतीने प्रशांत यादव यांचा सन्मान करण्यात आला.

या वेळी बोलताना प्रशांत यादव म्हणाले, की पक्ष नेतृत्वाने दिलेली जबाबदारी, दाखवलेला विश्वास, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे पाठबळ यामुळे मला जिल्हाध्यक्ष पद मिळाले. त्यामुळे आपल्या सर्वांना अपेक्षित असलेले काम माझ्या हातून घडेल असा विश्वास देतो. यापूर्वीच्या मंडळींनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी योगदान दिले आहे. याची जाणीव ठेवून आपण सर्वांनी काम करायचे आहे. पक्षासाठी योगदान देणाऱ्या जुन्या मंडळींचा योग्य सन्मान राखला गेला जाईल. आपल्याला पक्ष संघटन बळकट करण्यासाठी आणखी खूप काम करायचे आहे. त्यासाठी सर्वांनी साथ द्या, असे आवाहनही यावेळी श्री. यादव यांनी केले.

या वेळी सुनिल राणे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच मतदार यादी शुद्धीकरण अभियानाबाबत (एस. आय. आर.) उपस्थितांना मार्गदर्शन केले. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हे अभियान अतिशय महत्त्वाचे असल्याने बुथप्रमुखापासून सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी सजग राहून या अभियानात काम करा, अशी सूचना यावेळी सुनिल राणे यांनी सर्वांना केली.

व्यासपीठावर जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, ओंकार फडके, सुप्रिया उतेकर, अभिजित गुरव, जिल्हा उपाध्यक्ष राजू भाटलेकर, प्रमोद अधटराव, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत शाह, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अजित निकम, संगमेश्वर उत्तर मंडल अध्यक्ष रुपेश कदम, संगमेश्वर उत्तर मंडल अध्यक्ष विनोद म्हस्के, रत्नागिरी उत्तर मंडल अध्यक्ष विवेक सुर्वे, रत्नागिरी दक्षिण मंडल अध्यक्ष दादा दळी, रत्नागिरी शहर मंडल अध्यक्ष दादा ढेकणे, लांजा उत्तर मंडल अध्यक्ष विराज हरमले, लांजा दक्षिण मंडल अध्यक्ष शैलेश खामकर, राजापूर पूर्व मंडल अध्यक्ष एकनाथ मोंडे, राजापूर पश्चिम मंडल अध्यक्ष मोहन घुमे आदी उपस्थित होते. तसेच जिल्हा कार्यकारिणीतील नवनिर्वाचित पदाधिकारी, जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुक्ता बाष्टे यांनी सूत्रसंचालन केले.

Breaking News

लांजा मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथाचा ११०वा चैत्रोत्सव २८ मार्चपासून

लांजा मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथाचा ११०वा चैत्रोत्सव २८ मार्चपासून-- लांजा :...