रत्नागिरीरत्नागिरी मत्स्य विभाग ॲक्शन मोडवर

रत्नागिरी मत्स्य विभाग ॲक्शन मोडवर

👉 रात्रीच्या सुमारास मिरकरवाडा ते गणपतीपुळे दरम्यान नियमित सागरी गस्ती दरम्यान मत्स्यव्यवसाय विभागाचेे अंमलबजावणी अधिकारी श्रीमती. स्मितल कांबळे,परवाना अधिकारी,जयगड या नियमित गस्त घालत असताना दि. 4/4/2026 रोजी पहाटे 2.17 वाजण्याच्या सुमारास राज्याच्या जलधि क्षेत्रासाठी मासेमारी परवाना असलेली श्री. कैलास उल्हास कुबल रा. राजवाडी, भगवती बंदर, ता. जि रत्नागिरी यांच्या मालकीची मासेमारी नौका “भराडी प्रसन्न” नोंदणी क्रमांक IND-MH-04-MM-3723 द्वारे महाराष्ट्राच्या सागरी जलधि क्षेत्रात मिऱ्या – काळबादेवी समोर 17°03’834″N, 73°04’132″ E या ठिकाणी जवळपास 10.83 NM दरम्यान अनधिकृतपणे एल. ई . डी लाईट लाऊन मासेमारी करण्याच्या हेतूने नांगरुन उभी असताना मत्स्य विभागामार्फत पकडण्यात आली. या नौकेवर तांडेलसह 5 खलाशी होते.
सदर नौकेवर आढळलेले एल.ई .डी लाईट व जनरेटर नोकेसह पुढील कार्यवाहीपर्यंत मिरकरवाडा बंदरात जप्त करून ठेवण्यात आले आहेत.
सदर प्रकरणी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा) अध्यादेश, 2021 अन्वये कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
अंमलबजावणी अधिकारी श्रीमती.स्मितल कांबळे, परवाना अधिकारी, जयगड तसेच सुरक्षा रक्षक श्री.सुजन पोवार व सागरी सुरक्षा रक्षक श्री.अमोल पिलणकर, श्री. अनिकेत पवार आणि श्री.भूषण करमरकर यांचे सहकार्याने सदर कारवाई करण्यात आली आहे. अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर सदर नौकेबाबत सुनावणी मा. अभिनिर्णय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी यांचे कोर्टात ठेवण्यात येणार आहे.
सदरील संपूर्ण कारवाई ही मा. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, श्री. सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आली आहे.. मागील काही दिवसांपासून रत्नागिरी मत्स्य विभाग ॲक्शन मोडवर आला असून एलईडी द्वारे मासेमारी करणाऱ्या बोटींवर धडक कारवाई ची मोहीम सुरू केली आहे

Breaking News

शिक्षणाची पंढरी आता होणार ‘निवासी’; कारभाटले विद्यालयाच्या नूतन वसतिगृहाचे स्वप्न साकार

शिक्षणाची पंढरी आता होणार ‘निवासी’; कारभाटले विद्यालयाच्या नूतन वसतिगृहाचे...

आरवली,संगमेश्वर , सप्तलिंगी बावनदी ,अंजनारी पुलाना मंजुरी

⏺️मंत्री उदय सामंत यांच्या मागणी नंतर तब्बल ८४.५७ कोटीला...