रत्नागिरीरत्नागिरी - मिरजोळे एमआयडीसी येथील मे. जिलानी मरीन प्रॉडक्टस या कंपनीची सुमारे...

रत्नागिरी – मिरजोळे एमआयडीसी येथील मे. जिलानी मरीन प्रॉडक्टस या कंपनीची सुमारे 1 कोटी 58 लाख 75 हजार 240 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे

रत्नागिरी – मिरजोळे एमआयडीसी येथील मे. जिलानी मरीन प्रॉडक्टस या कंपनीची सुमारे 1 कोटी 58 लाख 75 हजार 240 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात कर्नाटक येथील एका निर्यातदार कंपनीच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जिलानी मरीन प्रॉडक्टस ही कंपनी मत्स्य उत्पादनांवर प्रक्रिया करण्याचे काम करते . या कंपनीत अकाउंट मॅनेजर म्हणून कार्यरत असलेले हैदरअली शब्बीर सनदी यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे . 6 सप्टेंबर 2025 ते 13 नोव्हेंबर 2025 या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला . मंगळुरू येथील किशोर कुमार आणि कंपनी ( एक्सपोर्ट्स ) प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक श्रीधरन किशोर कुमार यांनी मध्यस्त म्हणून जिलानी मरीन कंपनीकडून इटलीतील अर्दिमार एस. आर.एल . या कंपनीसाठी 24 टन मत्स्य उत्पादनांची मागणी केली होती. मालाची रक्कम वेळेत देण्याचे आश्वासन देऊन त्यांनी कंपनीचा विश्वास संपादन केला .

संशयित आरोपी श्रीधरन किशोर यांनी जिलानी मरीन कंपनीची दिशाभूल करुन सुमारे 1 लाख 82 हजार डॉलर्स किमतीचा 24 टन माल इटलीतील कंपनीला पाठवण्यास भाग पाडले .
मात्र या मालाची विक्री झाल्यानंतरही त्यापोटी येणारी 1 कोटी 58 लाख 75 हजार 240 रूपयांची रक्कम जिलानी मरीनच्या बँक खात्यात जमा न करता स्वतःकडेच ठेवून कंपनीचा विश्वासघात केला . आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कंपनीच्या वतीने पोलिसांत धाव घेण्यात आली . या तक्रारीवरून रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 316(2) आणि 318 (3) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक 24/2026 नुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Breaking News

सती चिंचघरी प्राथमिक विदयालयाचा सह्याद्री प्रज्ञाशोध स्पर्धेत दिमाखदार विजय

सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी चिंचघरी (सती) ता....

नगराध्यक्षांनी घेतला शिमगोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा

रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी-जोगेश्वरी यांच्या आगामी शिमगोत्सवाच्या निमित्ताने...