रत्नागिरीरत्नागिरी येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित नवनिर्माण हायस्कूलमध्ये शिक्षक प्रशिक्षण उत्साहात संपन्न

रत्नागिरी येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित नवनिर्माण हायस्कूलमध्ये शिक्षक प्रशिक्षण उत्साहात संपन्न

रत्नागिरी येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित नवनिर्माण हायस्कूलमध्ये शिक्षक प्रशिक्षण उत्साहात संपन्न

👉नवनिर्माण हायस्कूलमध्ये शिक्षकांच्या बौद्धिक विकासासाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन शाळेच्या संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये आणि मुख्याध्यापिका सौ. प्रज्ञा झारापकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
या प्रशिक्षणासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शैलजा मुळ्ये उपस्थित होत्या. त्यांनी अनुभवात्मक शिक्षण , विषय एकत्रीकरण तसेच सर्वसमावेशक शिक्षण या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना वर्गात सतत उत्साहाने व सक्रियपणे सहभागी करून घेण्यासाठी विविध कृतीआधारित अध्यापन पद्धती, खेळ, गटचर्चा, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि परस्परसंवादी तंत्रांचा प्रभावी वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनुभवात्मक शिक्षण, विषय एकत्रीकरण, STEM उपक्रम आणि सर्वसमावेशक शिक्षणाचा प्रभावी वापर करून प्रत्येक विद्यार्थ्याला अध्यापन प्रक्रियेत सहभागी करून घेण्यावर विशेष भर देण्यात आला.
या प्रशिक्षणास नवनिर्माण हाय इंग्लिश मिडीयम स्कूल , रत्नागिरी येथील शिक्षकांसह नवनिर्माण पब्लिक स्कूल, संगमेश्वर तसेच फातिमा कॉन्व्हेंट हायस्कूल, रत्नागिरी येथील शिक्षकांचीही उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. सर्व शिक्षकांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
प्रशिक्षणातील कृती, चर्चा आणि प्रात्यक्षिकांमुळे वातावरण प्रेरणादायी व उत्साहवर्धक बनले. या कार्यशाळेमुळे शिक्षकांना अध्यापन अधिक परिणामकारक, नाविन्यपूर्ण आणि विद्यार्थीकेंद्रित करण्यासाठी अनेक उपयुक्त कल्पना व तंत्रे आत्मसात करता आली.
शेवटी या प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये आणि मुख्याध्यापिका सौ. प्रज्ञा झारापकर यांचे सर्व उपस्थित शिक्षकांनी मनःपूर्वक आभार मानले.

Breaking News

आषाढी एकादशीनिमित्त जिल्हा.परिषद. आदर्श मराठी शाळा वहाळ येथे दिंडी उत्साहात

आषाढी एकादशीनिमित्त जिल्हा.परिषद. आदर्श मराठी शाळा वहाळ येथे दिंडी...

पावस उपडाकघराचा विक्रम; दोन दिवसांत १,१८७ नवीन खाती उघडली

पावस उपडाकघराचा विक्रम; दोन दिवसांत १,१८७ नवीन खाती उघडलीरत्नागिरी...