रत्नागिरीरत्नागिरी येथील प्रसिद्ध आणि लोकप्रिय एम. एस. नाईक इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये...

रत्नागिरी येथील प्रसिद्ध आणि लोकप्रिय एम. एस. नाईक इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात

रत्नागिरी येथील प्रसिद्ध आणि लोकप्रिय एम. एस. नाईक इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात-
👉दीड महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर एम. एस. नाईक प्रायमरी आणि चाईल्ड केयर नर्सरी इंग्लिश मीडियम स्कूल, रत्नागिरी येथे नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात करण्यात आली. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे फुले, टाळ्यांच्या गजरात आणि आनंदी वातावरणात स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अभिषेक दुडे सर व सौ.सायली पाटील मॅडम उपस्थित होते. त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना मन लावून अभ्यास करण्याचा, शिस्त पाळण्याचा व आपल्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा संदेश दिला.
नवीन गणवेश, दप्तर आणि चेहऱ्यावर उत्साह घेऊन विद्यार्थी शाळेत दाखल झाले. शाळा आकर्षक सजावटीने नटली होती. विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.शिक्षकांनी शिशुगटातील विद्यार्थ्यांशी प्रेमाने संवाद साधत त्यांना वर्गातील खेळणी, शैक्षणिक साहित्य आणि विविध कृतींची ओळख करून दिली. गाणी, गोष्टी, खेळ आणि ओळख परेड यामुळे मुलांमधील भीती दूर होऊन त्यांनी आनंदाने उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. संस्थेचे अध्यक्ष श्री.नौमान नाईक,मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अकीब काझी, शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.आरिफा म्हालदार, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.अशफाक नाईक यांनी सर्व विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देत नियमित उपस्थिती, स्वच्छता व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार गोळप व फणसोपमधील...

न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे येथे ‘AI तंत्रज्ञान वर्ग खोली’चे दिमाखात उद्घाटन

न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे येथे ‘AI तंत्रज्ञान वर्ग...