रत्नागिरीरत्नागिरी येथे जयेश मंगल कार्यालयात पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत...

रत्नागिरी येथे जयेश मंगल कार्यालयात पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेतील विषय समित्या तसेच गटनेतेपदाची निवड करण्यासाठी नवनिर्वाचित सदस्यांची बैठक संपन्न झाली

नुकत्याच झालेल्या रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीत ५६ पैकी ४१ जागा जिंकून शिवसेने निर्णायक यश मिळवले होते.रत्नागिरी येथे जयेश मंगल कार्यालयात पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेतील विषय समित्या तसेच गटनेतेपदाची निवड करण्यासाठी नवनिर्वाचित सदस्यांची बैठक संपन्न झाली.यावेळी सर्वानुमते गटनेतेपदी विलास चाळके यांची तर मुख्य प्रतोद म्हणून बाबू म्हाप यांची निवड करण्यात आली. या बैठकीत नवनिर्वाचित सदस्यांचा सन्मान करुन त्यांना भावी वाटचाली पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी शुभेच्छा दिल्या आणि सर्वांनी एकजुटीने काम करावे असे आवाहन केले काम करताना पक्ष मोठा कसा होईल याकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे असे सांगितले .

Breaking News