रत्नागिरीरत्नागिरी शहरातील दामले विद्यालयाच्या नूतन इमारतीच्या भूमीपूजन समारंभास राज्याचे उद्योग व मराठी...

रत्नागिरी शहरातील दामले विद्यालयाच्या नूतन इमारतीच्या भूमीपूजन समारंभास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थिती दर्शवली. MIDC स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत रत्नागिरी शहरातील वॉर्ड क्र. ६ मधील दामले विद्यालयाच्या (नगरपरिषद शाळा क्र. १५) नूतन इमारतीचे भूमिपूजन मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते झाले.

तब्बल १५,३८,९४,०८९ रुपयांचा निधी या शाळेच्या नूतन इमारतीसाठी मला उपलब्ध करून देता आला, याचे मला समाधान आहे. शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयावर, विशेषतः सरकारी शाळेसाठी, सरकार मधील जबाबदार मंत्री म्हणून निधी खर्च करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. दामले विद्यालयाचे नाव शिक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्रातील अत्युत्कृष्ट शाळांमध्ये घेतले जाते.
भविष्यात सरकारी शाळा कशा असाव्यात याचा आदर्श दामले विद्यालय महाराष्ट्रात निर्माण करेल, अशी अपेक्षा मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केली.

दामले विद्यालयातील विद्यार्थी केवळ देशातच नव्हे, तर जगभरातील विविध ठिकाणी कार्यरत असून, विद्यालयाचे नाव अभिमानाने घेतात, हे महत्त्वाचे आहे. रत्नागिरी शहराला स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत ४५० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
या योजनेतून रत्नागिरी शहर देशात अव्वल क्रमांकाचे शहर म्हणून पुढे यावे, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केली.

या वेळी भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार साळवी, प्राचार्य शिवलकर शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शहर प्रमुख बिपीन बंदरकर, श्रद्धा हळदणकर, राजन शेट्ये यांच्यासह सर्व विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ, पदाधिकारी, अधिकारी आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.माजी विद्यार्थी म्हणून रत्नागिरी येथील प्रसिद्ध फिजिशियन डॉ शिरीष शेनई यांनी आपले मनोगत व्यक्त केले

Breaking News

पवार कुटुंबीयांचे मंत्री नितेश राणे यांनी केले सांत्वन

बारामती: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे...