रत्नागिरीरत्नागिरी शहरातील पटवर्धन हायस्कूलचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश..दोन विद्यार्थीनी संपादन केले...

रत्नागिरी शहरातील पटवर्धन हायस्कूलचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश..दोन विद्यार्थीनी संपादन केले शंभर टक्के गुण

१ .कुलापकर वेदांग व पूर्वा माईणकर 100% गुण प्राप्त विद्यार्थी ।
शाळेतील प्रथम पाच विद्यार्थी
1 .कुलापकर वेदांग नितीन 100%
1 .माईणकर पूर्वा राजन – 100%
2 .नाईक श्रावणी बाहुबली – 99.20 %
3.मुदगल श्रेया गंगाराम- 98.20 %
4 .घाटगे दिव्यांका अमर 98.00 %
5 .काळे मैत्रेयी शैलेश 96.80 %

विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी संख्या – 129
प्रथम श्रेणी प्राप्त विद्यार्थी संख्या – 120
द्वितीय श्रेणी प्राप्त विद्यार्थी संख्या – 70

शाळेचा निकाल – 98 .47 %
मुख्याध्यापिका श्रीमती जानकी घाटविलकर, उपमुख्याध्यापक श्री रुपेश पंगेरकर, तसेच पर्यवेक्षक श्री अमर लवंदे व श्रीमती कल्पना शिरोळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत उत्तम निकाल साध्य केला.

संस्थेचे अध्यक्ष श्री नंदकुमार साळवी , कार्याध्यक्षा श्रीमती नमिता कीर आणि कार्यवाह श्री सुनील वणजु यांनी निकालाबद्दल विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. उपकार्याध्यक्ष श्री . श्रीराम भावे व चंद्रकांत घवाळी तसेच संस्थेचे सहकार्यवाह श्री.संजय जोशी यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे तसेच मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे .

भारत शिक्षण मंडळ व पटवर्धन प्रशालेमार्फत गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करून त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

हा दिमाखदार निकाल हे या संस्थेतील शैक्षणिक गुणवत्ता, शिक्षकांचे समर्पण व पालकांचे आशीर्वाद व विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे फलित आहे.

Breaking News

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 17/06/2025

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक - 17/06/2025 १) मंडणगड - 25.50 मिमी२)...