रत्नागिरीरत्नागिरी शहरातील माळनाका येथील एस टी काॅलनी येथील श्री साई मंदिराच्या २५...

रत्नागिरी शहरातील माळनाका येथील एस टी काॅलनी येथील श्री साई मंदिराच्या २५ साव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते संतोष सावंत व माजी नगरसेवक सुदेश मयेकर यांचा सत्कार करण्यात आला

रत्नागिरी शहरातील माळनाका येथील एस टी काॅलनी येथील श्री साई मंदिराच्या २५ साव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते संतोष सावंत व माजी नगरसेवक सुदेश मयेकर यांचा सत्कार करण्यात आला. दर्शनासाठी व महाप्रसाद घेण्यासाठी साईमंदिराचे पदाधिकारी निमंत्रित होतो. मंदिराच्या वतीने इतर सर्वांचा यथोचित सन्मान करण्यात आला. एस टी काॅलनी म्हटले कि आमच्या शालेय जिवनातील जवळचे मित्र यामध्ये दिपक मनवाडकर, कै राजू घाडगे, विरू शरण सुरेखा जाधव आमचा मित्र नरू शिर्के असे अनेक जण या काॅलनीत रहायचे त्यामुळे या सर्वांसोबत चांगले संबंध खरतर ही सगळी मंडळी आता रिटायर होवून वेगवेगळ्या ठिकाणी घर बांधून रहात आहेत पण एसटी काॅलनीशी नाळ आजही जोडल्याचे बघायला मिळाले रिटायर्ड झालेल्या सर्वांनी आणि आता रहात असलेल्या लोकांनी एकत्र येऊन आपल्या साईमंदाचा उत्सव साजरा केला हा साजरा करण्याआधी आमचा मित्र नरेंद्र शिर्के यांनी त्या सर्वांसमवेत माझी भेट घालून दिली आणि या उत्सवाला लागणारी मदत मुख म्हणजे भटजी आमचे नाना जोशी यांची भेट घालून दिली आज सगळी जबाबदारी त्यांनी पार पाडली श्रीराम याग झाला व सत्यनारायण पूजा देखील करण्यात आली आज दुपारी सर्वांना महाप्रसाद देण्यात आला एकंदरीत कित्येक वर्षे रिटायर्ड झालेल्या लोकांनी एकत्र येऊन आपल्या लहानपणी बांधलेल्या मंदिराचा उत्सव दिमाखात साजरा केला मुख्यत्वे यात प्रमोद नलावडे , बंड्या खानविलकर, नरेंद्र शिर्के,आखाडे व ईतर सहकारी मित्रांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले अशी भावना संतोष सावंत यांनी व्यक्त केली

Breaking News

पत्रकारावरील हल्ल्याचा चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध; दोषींवर कडक कारवाईची मागणी

पत्रकारावरील हल्ल्याचा चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध; दोषींवर कडक...