रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या सेवा पंधरवड्याचे औचित्य साधून आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस या निमित्ताने आज सकाळी भाजप नगरसेवकांनी रत्नागिरी नगरपालिकेतील स्वच्छता दूतांना आवश्यक स्वच्छता साहित्याचे वितरण केले…
याप्रसंगी स्वच्छता निरीक्षक संदेश कांबळे हर्षवर्धन काटकर, प्रशासकीय अधिकारी श्री. बेहरे, विद्युत निरीक्षक जितेंद्र विचारे, आनंद थोरात यांच्यासह भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर ,माजी नगरसेवक राजू तोडणकर, मुन्ना चवंडे, उमेश कुळकर्णी, समीर तिवरेकर, मानसी करमरकर, भाजपाचे माजी शहराध्यक्ष सचिन करमरकर उपस्थित होते.
याप्रसंगी स्वच्छतादुताना गमबुट 100, घमेली 25, फावडे 25, खुरपे 50, कुदळ 25, हॅन्डग्लोज 100 (जोडी) यांचे वितरण करण्यात आले. तसेच सर्वाना अल्पोपहार देण्यात आला. याबद्दल सर्व स्वच्छता दूतांनी आभार मानून माजी बांधकाम मंत्री प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
रत्नागिरी शहरामध्ये विविध ठिकाणी निर्माण होणारा कचरा उचलून स्वच्छतेचे काम स्वच्छतादूत प्रामाणिकपणे करत असतात. मात्र काही वेळा आवश्यक साहित्य नसल्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो. ही अडचण जाणून घेऊन भाजपा माजी नगरसेवकांनी सेवा पंधरवडा निमित्त स्वतः हे साहित्य खरेदी करून ते आज स्वच्छतादूतांना सन्मानाने वितरित केले. या वेळी स्वच्छतादुतांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले. हे सर्व साहित्य घेऊन आज सर्व स्वच्छतादूत भाट्ये येथे स्वच्छतेसाठी तातडीने रवानाही झाले. कामावर वेळेवर जाण्याकरिता त्यांची लगबग सुरू होती. परंतु त्यांनी न विसरता भाजपा नगरसेवकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी बोलताना भाजपाचे माजी नगरसेवक उमेश कुळकर्णी यांनी सांगितले की, आम्ही फार मोठे काम केलेले नाही. खरे काम हे स्वच्छतादूत करत असून त्यांच्यामुळेच रत्नागिरी शहर स्वच्छ ठेवण्यात यश मिळत आहे. परंतु नागरिकांनीही कचरा रस्त्यावर न टाकता तो वर्गीकरण करून कचरा गाडीतच द्यावा. असे आवाहन करण्यात आले