रत्नागिरीरत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दित रत्नागिरी एज्यूकेशन सोसायटीची रा. भा. शिर्के हायस्कूल...

रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दित रत्नागिरी एज्यूकेशन सोसायटीची रा. भा. शिर्के हायस्कूल मध्ये जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅली व प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला

जनजागृती रॅली रा भा शिर्के हायस्कूल- माळनाका ओव्हर ब्रिज-हॉटेल सिल्व्हर स्वॅन- थिबा पॅलेस रोड फाटा- अव्दैत पेट्रोल पंप- माळनाका गार्डन- शासकिय विश्रामगृह- शिर्के प्रशाळा पर्यंत काढण्यात आली सदर रॅली मध्ये 80 ते 100 विद्यार्थी सहभागी झालेले होते.

*जनजागृती कार्यक्रम -* रा.भा.शिर्के विद्यालयाचे हॉल मध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये श्री के डी कांबळे मुख्याध्यापक यांनी जागतिक अंमली पदार्थ दिन अनुषंगाने प्रस्तावना केली त्यानंतर श्री.सतीश शिवरकर, पोलीस निरीक्षक शहर पोलीस ठाणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, सामाजिक व मानसिक परिणाम याविषयी उपयुक्त असे मार्गदर्शन केलेले आहे. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा घेवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

सदर कार्यक्रमास 8 वी, 9 वी, 10 वी व 12 वी वर्गातील सुमारे 350-400 विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच शिक्षकवर्ग सहभागी झालेला होता.

Breaking News