रत्नागिरीरत्नागिरी संस्कृत उपकेंद्राच्या विद्यार्थ्यांची योगशास्त्रात राज्यस्तरावर गरुडझेप.

रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राच्या विद्यार्थ्यांची योगशास्त्रात राज्यस्तरावर गरुडझेप.

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्रातील योग शास्त्राच्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश संपादित केले आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्हा योगासन क्रीडा संघटना, महाराष्ट्र योगासन क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने Ratnagiri District yogasana sports championship 2025-26 ची निवड फेरी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे पार पडली.
या निवड फेरीत रत्नागिरी उपकेंद्र बी ए योगशास्त्र आणि एम ए योगशास्त्र विषयाच्या ४ विद्यार्थ्यांची राज्यस्तरासाठी निवड झाली आहे. या ४ विद्यार्थ्यांमध्ये निकिता लाड (BA 1st year ), पूर्वा पावसकर( BA 2nd year), महादेव काळे (BA 2nd year), अपूर्वा मुसळे ( MA 2 nd year) यांचा समावेश आहे.आपल्या योग विषयक कौशल्याच्या जोरावर व गुरुजनांच्या भक्कम पाठिंब्यामुळे विद्यार्थ्यांनी ही विजयश्री खेचून आणली आहे. दरम्यान जाहीर झालेल्या निवड फेरीच्या निकालाप्रमाणे निकिता लाड (Backbend individual -1st rank आणि Leg balance individual – 1st rank) तसेच मानसी यमगर (Traditional 2 nd rank) आणि अपूर्वा मुसळे( Traditional 1 st rank व SUPPINE. 3 rd Rank) आणि पूर्वा पावसकर (Traditional Senior 1 st rank) व महादेव काळे (senior-B Traditional 1st rank) या प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी यश संपादित केलं आहे. या सर्व चमूला रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांचे विशेष सहकार्य प्राप्त झाले आहे. उपकेंद्रातील प्रा अक्षय माळी आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू सौरभ कुमार नागपूर यांचे योग प्रात्यक्षिकासाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिवाय प्रा अविनाश चव्हाण व प्रा कश्मिरा दळी यांचेही सहकार्य लाभले आहे. तसेच राष्ट्रीय योगपटू दुर्वांकुर चाळके आणि रत्नागिरी जिल्हा योग असोसिएशनचे अध्यक्ष गौरव आंब्रे यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक कामगिरीसाठी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो हरेराम त्रिपाठी व रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ दिनकर मराठे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Breaking News