रत्नागिरीरत्नागिरी : सेंट थॉमस शाळेत १०५ मुलींना एचपीव्ही लसीकरण यशस्वी-

रत्नागिरी : सेंट थॉमस शाळेत १०५ मुलींना एचपीव्ही लसीकरण यशस्वी-

आयुष्मान आरोग्य मंदिर, पोमेंडी बुद्रुक (प्राथमिक आरोग्य केंद्र चांदेराई), तालुका- जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने सेंट थॉमस शाळा येथे ९ ते १४ वयोगटातील १०५ मुलींना एचपीव्ही (HPV) लस देण्यात आली.
सदर लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या पार पडली असून लसीकरणानंतर कुठल्याही प्रकारची गुंतागुंत अथवा दुष्परिणाम आढळून आले नाहीत. लसीकरण प्रक्रियेदरम्यान विद्यार्थिनी, पालकवर्ग तसेच शाळेतील सर्व शिक्षकवर्ग यांचे उत्तम सहकार्य व सकारात्मक प्रतिसाद लाभला.
ही लस गर्भाशय मुखाच्या कर्करोग प्रतिबंधाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, योग्य वयात एचपीव्ही लसीकरण केल्यास भविष्यातील गंभीर आजार टाळण्यास मदत होते.
सदर लसीकरणास प्राथमिक आरोग्य केंद्र चांदेराई च्या वैद्यकीय अधिकारी डॉ शीतल सूर्यवंशी,समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) श्रीम. अंभोरे,आरोग्य सेविका श्रीमती रसाळ, पालशेतकर, स्वाती शिंदे, अनुश्री शिंदे,श्रीमती फुकट तसेच आरोग्यसेवक चव्हाण, गट प्रवर्तक श्रीमती इंदुलकर,आशा सेविका श्रीमती पांचाळ, लांजेकर, कुळीये,मोरे, तेरवणकर उपस्थित होत्या.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात एचपीव्ही लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत असून, पात्र लाभार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
— आरोग्य विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी

Breaking News

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पा मध्ये पालकमंत्री डॉ.उदय सामंतांची बल्ले बल्ले

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पा मध्ये पालकमंत्री डॉ.उदय सामंतांची बल्ले बल्ले.....

जिष्णू देव वर्मा बनले महाराष्ट्राचे नवे राज्यपाल.

👉केंद्र सरकारने देशातील 9 राज्यांच्या राज्यपाल आणि काही...