रहेजा चौक, पुणे येथे स्वर्गीय गंगुबाई संभाजी शिंदे फेस्टिवल 2025 अंतर्गत आयोजित भव्य रास दांडिया महोत्सवाला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. डॉ उदय सामंत ह्यांनी भेट दिली. यावेळी ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थित भाविकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, शिवसेनेचे उपनेते सुलभा उबाळे, जिल्हा संपर्कप्रमुख गीतांजली ढोणे, पूजा रावेतकर, शिरूर महिला आघाडी संपर्कप्रमुख सारिका पवार, युवा सेना महानगरप्रमुख राजेश पळसकर, उपशहर प्रमुख नितीन पवार आनंद भिलारे यांच्यासह असंख्य शिवसेना पदाधिकारी तसेच पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
