गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर मुक्तागिरी निवासस्थान, मुंबई येथे राज्यभरातील विविध राजकीय पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.
या प्रसंगी सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेतील नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, युवा पदाधिकारी, शिवसेनेचे लोकप्रिय आमदार सुहास भैया, आणि अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिंदे साहेब हे शाखा प्रमुखापासून मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास करणारे नेतृत्व असल्याने, कार्यकर्त्यांचे दुःख, आशा आणि आकांक्षा त्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहेत. त्यामुळे आज शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सर्व नविन सहकाऱ्यांना सांगू इच्छितो —”तुम्ही आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहात, तुमच्या सर्व राजकीय इच्छा आणि अपेक्षा पूर्ण केल्या जातील – याचा शब्द मी देतो” असे ना. उदय सामंत ह्यांनी म्हटले.
शिवसेना हा फक्त पक्ष नाही, तर कुटुंब आहे. या कुटुंबामध्ये कोणताही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी – जुना असो की नवा – त्याला संपूर्ण सन्मान आणि संधी दिली जाते.
आज बाबरी आंदोलनात सहभागी झालेल्या, शिवसेनेच्या तेजस्वी इतिहासाचे साक्षीदार असलेल्या सुरेश शेळके यांनीही शिवसेनेत प्रवेश करून एक संदेश दिला –”खऱ्या अर्थाने बाळासाहेबांची शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबच पुढे नेत आहेत!”
रत्नागिरीपासून सांगलीपर्यंत – राज्याच्या कानाकोपऱ्यात – शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली काम करणारे कार्यकर्ते आणि त्यांचे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी शिंदे साहेबांची पूर्ण ताकद कायम उभी राहील, असे यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी म्हटले.