रत्नागिरीराज्यस्तरीय “आदर्श शिक्षिका” पुरस्काराने श्रीमती नर्गिस तुळवे यांचा गौरव

राज्यस्तरीय “आदर्श शिक्षिका” पुरस्काराने श्रीमती नर्गिस तुळवे यांचा गौरव

राज्यस्तरीय “आदर्श शिक्षिका” पुरस्काराने श्रीमती नर्गिस तुळवे यांचा गौरव

उर्दू शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल; शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकीही जपली

✒️ शाहिद अहमद तुळवे/ कडवई

उर्दू शिक्षण क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या श्रीमती नर्गिस शाहिद अहमद तुळवे यांना अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाच्या वतीने राज्यस्तरीय “आदर्श शिक्षिका” पुरस्काराने गौरविण्यात आले. महाबळेश्वर येथील अंजुमन खैरूल इस्लाम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष सत्कार सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यास अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे संस्थापक व राष्ट्रीय सरचिटणीस श्री. साजीद निसार, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष (माध्यमिक) श्री. इरफान अन्सारी, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष (प्राथमिक) श्री. रिजवान शेख, राज्य कार्याध्यक्ष (माध्यमिक) श्री. शौकत म्हाते तसेच अंजुमन खैरूल इस्लाम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती शबाना शेख यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीमती नर्गिस शाहिद अहमद तुळवे यांचा शाल, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
श्रीमती नर्गिस शाहिद अहमद तुळवे यांनी शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अध्यापनातील नाविन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे नाते, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची तळमळ आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची त्यांची शैली यामुळे त्या विद्यार्थ्यांमध्ये तसेच पालकांमध्येही लोकप्रिय ठरल्या आहेत.
त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत यापूर्वीही विविध स्तरांवर त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्या अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाच्या महिला शाखेच्या सहसचिव म्हणूनही प्रभावीपणे जबाबदारी सांभाळत आहेत. संघटनात्मक कामकाज, शिक्षण क्षेत्रातील योगदान आणि सामाजिक उपक्रम यांचा त्यांनी उत्तम समन्वय साधला आहे.
शिक्षणासोबतच सामाजिक क्षेत्रातही त्या सक्रिय असून विविध जनजागृती उपक्रम, शैक्षणिक मोहिमा आणि समाजोपयोगी कार्यांमधून सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांच्या या सर्वांगीण कार्याची दखल घेत अखील भारतीय उर्दू शिक्षक संघातर्फे प्रदान करण्यात आलेला “आदर्श शिक्षिका” पुरस्कार हा त्यांच्या समर्पित कार्याचा सन्मान मानला जात आहे.
त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक तसेच उर्दू शिक्षण क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून अनेकांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Breaking News

घनकचरा व्यवस्थापनासाठी ‘विशेष कक्ष’ स्थापन; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे आदेश

घनकचरा व्यवस्थापनासाठी 'विशेष कक्ष' स्थापन; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे...