राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या सुचनेनुसार आज कुणबी चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज, महाराष्ट्र राज्य यांच्या समवेत महत्त्वाच्या मागण्यांसंदर्भात बैठक आयोजित केली होती. या बैठकीला इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री. अतुल जी सावे, विभागाच्या सचिव विनिता वेद सिंघल यांच्यासह कुणबी चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीमध्ये मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी महामंडळा मार्फत राबविण्यात येत असलेल्या थेट कर्ज योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या. व्याज परतावा योजने अंतर्गत महामंडळाने दिलेले LOI आणि बँकेमार्फत झालेली कर्जमंजुरी यामधील तफावती, बँकेच्या अटी व शर्तीमध्ये शिथिलता आणण्यात यावी तसेच याशिवाय शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेतील मागणी कर्जाची मर्यादा वाढविण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार देशांतर्गत शैक्षणिक कर्जाची मर्यादा १० लाखांवरुन २० लाख रुपये आणि परदेशांतर्गत कर्जाची मर्यादा २० लाख रुपयांवरुन ४० लाख करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याची ग्वाही इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री. अतुल जी सावे यांनी यावेळी दिली.