रत्नागिरीराज्यातील ५३ हजार लाडक्या बहीणींची ओवाळणी हुकली

राज्यातील ५३ हजार लाडक्या बहीणींची ओवाळणी हुकली

राज्यातील ५३ हजार लाडक्या बहीणींची ओवाळणी हुकली!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीची पडताळणी तसेच ई-केवायसी प्रक्रियेनंतर लाखो महिलांची नावे यादीतून वगळण्यात आली. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्याचे अनुदान ‘ओवाळणी’ म्हणून सरकारच्या वतीने तीन दिवसापासून वितरित केले जात आहे.

यात अनेक कारणास्तव सुमारे ५३ हजार ६३७ लाडक्या बहीणींना सरकारची १५०० रुपये ‘ओवाळणी’ मिळालेली नाही. त्या अपात्र ठरल्या आहेत. यात ६५ पेक्षा जास्त वय झालेल्या बहीणींची संख्या जास्त आहे. गुरुवार संध्याकाळ पर्यंत एक कोटी ४१ लाख लाडक्या बहीणींना सरकारने दोन हजार ९५ कोटी रुपये ‘ओवाळणी’दिली.

राज्य सरकारने जून २०२४ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. सुरुवातीला लाभार्थ्यांची संख्या मोठी होती. आधार, ई-केवायसी, उत्पन्न, कुटुंबातील शासकीय कर्मचारी अथवा इतर योजनांचा लाभ तसेच अन्य पात्रता निकषांची पडताळणी केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर नावे कमी झाली. अर्ज दाखल केलेल्या एकूण दोन कोटी ४८ लाख लाडक्या बहीणीमधून एप्रिल अखेर पर्यंत सुमारे ९२ लाख नोंदी अपात्र ठरवण्यात आल्य आहेत. त्यामुळे लाडक्या बहीणींची लाभार्थी संख्या १.६५ कोटींवर आली आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर २५ ऑगस्टपासून जुलै महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू करण्यात आले.

सामाजिक न्याय विभाग, वित्त विभागाकडून मिळालेल्या निधीतून रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येपर्यंत १ कोटी ४१ लाख ८५ हजार महिलांच्या खात्यांमध्ये सुमारे २ हजार ९५ कोटी रुपये जमा करण्यात आले. लाडक्या बहीणींच्या खात्यात थेट अनुदान वर्ग करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती. त्यामुळे शिल्लक २३ लाख लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी मिळण्याची शक्यता आहे. योजनेच्या पात्रतेत २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिला हा प्रमुख निकष आहे. ६५ वर्षांची वयोमर्यादा ओलांडलेल्या महिलांना या योजनेचा लाभ सुरू ठेवता येत नाही. त्यामुळे सुमारे ५३ हजार महिलांना जुलैचा हप्ता मिळणार नाही. त्यांची सरकारमधील भावांकडून मिळणारी ओवाळणी हुकली आहे. दोन वर्षापूर्वी ही योजना जून महिन्यात लागू करण्यात आली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात आलेल्या रक्षाबंधनाला सरकारकडून एकाच वेळी तीन महिन्याचे अनुदान साडेचार हजार रुपये बहीणींच्या खात्यात जमा करण्यात आले होते. त्याला बहीणींना सरकारने दिलेली ओवाळणी म्हणून प्रचार केला गेला होता.

Breaking News

Πληρωμές & Δεσμεύσεις στο Spinsy casino

Οι κυβερνο βηματα στη διαδικτυακή ντόπια επιχείρηση έχουν εξελιχθεί,...

Luna Casino: Indbetalinger og Metoder

Indbetaling er fundamentet for en god spilleoplevelse hos Luna...