कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची अभिनव संकल्पना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कौशल्य, रोजगार व नाविन्यता विभागाने आयोजित केलेल्या महाराष्ट्रव्यापी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात विक्रमी ५७ हजार तरुणांनी नोंदणी केली तर २७ हजार तरुणांना एकच दिवशी रोजगार मिळाला आहे. राज्यातल्या तरुणांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस अविस्मरणीय ठरावा, त्यांच्या करिअर मध्ये नवा अध्याय सुरु व्हावा, या उद्देशाने कौशल्य विभागाने हा अभिनव उपक्रम राबवला असल्याचे कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले. मुंबईतील गावदेवी इथल्या शारदा मंदिर हायस्कूल मध्ये आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर व शारदा मंदिर हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला असून महाराष्ट्र भरात शंभर मेळावे आयोजित करण्यात आले होते.
विकासाची दूरदृष्टी असलेले आणि महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर पोहचवणारे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणांच्या रोजगारावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्या अनुषंगाने हा उपक्रम राबवला असल्याचेही मंत्री लोढा यांनी सांगितले. महाराष्ट्र आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यातून राज्यातल्या हजारो तरुणांचे स्वप्न साकार होत असून उज्जवल भविष्याकडे त्यांची वाटचाल सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनात यापुढे ही असे उपक्रम सुरूच राहतील असा विश्वास मंत्री लोढा यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रात विविध ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून हजारो तरुणांना खाजगी तसेच शासकीय महामंडळात काम करण्याची संधी उपलब्ध होत आहे. औद्योगिक, माहिती तंत्रज्ञान, विमा, लॉजीस्टिक, व्यवस्थापन आणि सेवा क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध होत आहेत. मुंबईतील गावदेवी इथल्या शारदा मंदिर हायस्कूल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात एकूण २५ अस्थापणांनी सहभाग घेतला यात पाच शासकीय महामंडळाचा ही सहभाग होता. तसेच पाचशे युवक युवतींनी या मेळाव्यात नोंदणी केली.
रोजगार मिळवून देणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश असला तरी, तरुणांना शासकीय योजनांची माहिती तसेच स्वयं रोजगाराबाबत समुपदेशन ही कौशल्य विभागा मार्फत सुरू असल्याची माहिती कौशल्य विभागाचे सहायक आयुक्त शैलेश भगत यांनी यावेळी दिली. कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी विद्या शिंगे आणि मुकेश संखेही यावेळी उपस्थित होते.