रत्नागिरीराधाकृष्ण मंदिर राधाकृष्ण वाडी, टेरव पूजेनिमित्त कबड्डी स्पर्धेचे आयोजन..

राधाकृष्ण मंदिर राधाकृष्ण वाडी, टेरव पूजेनिमित्त कबड्डी स्पर्धेचे आयोजन..

श्री सत्यनारायण महापूजे निमित्त राधाकृष्ण साधनालय संघ पुरस्कृत, राधाकृष्ण क्रीडा मंडळ आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन गुरुवार ८ मे ते शनिवार दिनांक १० मे २०२५ या कालावधीत कै.बाबुराव दादाजीराव कदम क्रिडा नगरीत राधाकृष्ण मंदिरा समोर आयोजित करण्यात आले आहे.
सदर स्पर्धा ग्रामीण कबड्डी विकास संघटना, चिपळूण या संस्थेच्या मान्यतेने घेण्यात येत असून एकूण २० संघ भाग घेणार आहेत.

स्पर्धेस घसघशीत रोख पारितोषिके व आकर्षक चषक भेट देण्यात येणार आहेत. अंतिम विजयी संघास कै. वसंतराव अमृतराव कदम यांच्या स्मरणाचा श्री अजित वसंतराव कदम यांसकडून रुपये रोख ₹. १०,००० व आकर्षक चषक, अंतिम उपविजयी संघास कै. सौरभ सुहासराव कदम (शिवछत्रपती पुरस्कार विजेते) यांस कडून रोख ₹.७५०० व आकर्षक चषक, दोन्ही उपांत्य विजय संघास प्रत्येकी ₹. ५,००० व आकर्षक चषक कै. रघुनाथ नारायणराव कदम यांच्या स्मरणार्थ श्री अशोक रघुनाथराव कदम व कै. महादेवराव कृष्णाजीराव यांच्या स्मरणार्थ श्री निलेश महादेवराव कदम यांसकडून देण्यात येणार आहेत. उत्कृष्ट चढाई साठी कै. अनंतराव सखारामराव मोर यांच्या स्मरणार्थ श्री प्रशांत अनंतराव मोरे आणि बंधू, उत्कृष्ट पकडी करिता कै. सौ. वनमाला मानसिंगराव कदम यांच्या स्मरणार्थ श्री स्वप्नील मानसिंगराव कदम, सर्वोत्कृष्ट खेळाडू करीता कै. दीपकराव दिनकरराव कदम यांच्या स्मरणार्थ श्री विनय दीपकराव कदम, तर शिस्तबद्ध संघास कै. राधेश्याम पांडुरंगराव कदम यांच्या स्मरणार्थ श्री रुपेश राधेश्यामराव कदम यांच्या वतीने आकर्षक चषक प्रदान करण्यात येणार आहे. तसेच मान्यवरांसाठी २५ सन्मानचिन्हे कै. सौ. वनमाला मानसिंगराव कदम यांच्या स्मरणार्थ श्री मानसिंगराव बाबुराव कदम यांनी प्रायोजित केली आहेत.

सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वाडीतील सर्व अबाल वृद्ध झटत आहेत. सर्व तरुणांनी तसेच वाडीतील अनेक मान्यवरांनी यथाशक्ती अर्थिक सहकार्य करून संस्थेस उपकृत केले आहे.

सदर संघाच्या वृक्षाचे, वटवृक्षात रुपांतर करण्यासाठी गेली पन्नास वर्षे कैलासवासी हणमंतराव, कशीरामराव, उद्धवराव, वसंतराव, दत्तारामराव, पर्वतराव, पांडुरंगराव, दत्तात्रयराव, सखारामराव, भाऊराव, जगन्नाथराव, बाबुराव या व इतर अनेक सद्गृहस्थानी अपार कष्ट घेतले आहेत. सध्या राधाकृष्ण साधनालय संघाचे कार्य पुढे नेण्याचे काम सर्वश्री धोंडजीराव, रघुनाथराव, दशरथराव, मानसिंगराव, बजाजीराव, संभाजीराव, भाऊराव, विश्वासराव अशोकराव, गोपीचंदराव, जिजाजी घडशी, वासुदेव सुतार व शहरातील व वाडीतील सर्व लहान थोर ग्रामस्थ व तरूण वर्ग एकत्रितपणे करत आहेत. राधाकृष्ण मंदिरात, वाडीत होणारे सर्व उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदान एकत्र पणे साजरे केले जातात.

कबड्डी स्पर्धेस येणाऱ्या अंदाजे ₹ १,५०,००० खर्च वाडीतील सर्व लहान थोर मंडळींनी सढळहस्ते सहकार्य करून उचलल्याबद्दल आम्ही सर्व तरुणवर्ग व बांधवांचे आभारी आहोत . सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वश्री शिरीष पांडुरंगराव कदम, ओंकार (बाबू) अशोकराव कदम, प्रशांत अनंतराव मोरे, विनय दीपकराव कदम, ओम अविनाशराव कदम यांनी विशेष मेहनत घेतली.

Breaking News

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 19/06/2025

१) मंडणगड - 95.00 मिमी२) खेड - 67.85 मिमी३)...

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण !

दसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या रिलायन्स एरोस्ट्रक्चर लिमिटेड (RAL)...