या इमारतीच्या बांधकामास मी पालकमंत्री असताना मंजुरी दिली होती. गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीच्या पूर्ततेसाठी माझ्या कार्यकाळात यश मिळाले. या नव्या सुविधेमुळे परिसरातील रुग्णांची अन्यत्र जाण्याची धावपळ थांबेल आणि त्यांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होतील, असा विश्वास यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी व्यक्त केला. तसेच, भविष्यात या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार कायम अग्रेसर राहील, अशी शाश्वती ना. उदय सामंत ह्यांनी बोलताना दिली.
या कार्यक्रमाला मंत्री प्रकाश अबिटकर, मंत्री भरत गोगावले, आमदार संतोष बांगर, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.