रत्नागिरीरा. प. रत्नागिरी आगार चालक-वाहक कृतज्ञता सोहळासंपन्न- ‌‌ST कर्मचाऱ्यांकडून, ST ला साथ...

रा. प. रत्नागिरी आगार चालक-वाहक कृतज्ञता सोहळासंपन्न- ‌‌ST कर्मचाऱ्यांकडून, ST ला साथ देणाऱ्या ग्रामस्थांचा सन्मान.

रा. प. रत्नागिरी आगारातील चालक-वाहकांतर्फे ग्रामीण भागात रात्र वस्तीच्या ठिकाणी चालक-वाहकांना वर्षानुवर्षे सोयी-सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामस्थांचा कृतज्ञता सोहळा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या सोहळ्यास मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून सर्व मान्यवरांचा सन्मान केला.

ST ही केवळ प्रवासाची सेवा नसून — ती महाराष्ट्राच्या जनजीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. ग्रामीण भागातील सरपंच, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांनी जेव्हा STच्या चालक-वाहकांना आधार दिला, तेव्हा ही सेवा खऱ्या अर्थाने “लोकसेवा” बनली.

आपल्या राज्यात दरवर्षी जवळपास पन्नास लाख प्रवाशांची जबाबदारी ST कर्मचाऱ्यांवर असते. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आवश्यक सुविधा व सहकार्य देणे ही आपली जबाबदारी आहे, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत म्हणाले.

कार्यक्रमात मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचित केले की —
“ग्रामपंचायतीतील कोणतीही बस सेवा बंद करताना स्थानिक सरपंचांचा विश्वास घेऊन निर्णय घ्या. ST ही लोकांच्या भावनांशी जोडलेली सेवा आहे, त्यामुळे प्रत्येक निर्णय हा लोकाभिमुख असावा.”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या दूरदृष्टीपूर्ण निर्णयांमुळे ST महामंडळाला नवसंजीवनी मिळाली आहे. शासनाच्या पाठबळावर आणि कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांवर ही सेवा अधिक सक्षम होत आहे.
ग्रामस्थ, सरपंच आणि अधिकारी — सर्वांच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्ह्यातील ST सेवा अधिक कार्यक्षम आणि जनतेच्या हिताची राहील, असा विश्वास मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केला.

Breaking News

मेळघाटच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊमंत्री उदय सामंत, प्रकाश आबिटकर यांचे आश्वासन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दूरध्वनीवरून संवाद-- अमरावती, मेळघाट संघर्ष यात्रेच्या...

कष्टकरी महिलांच्या कार्याला सलाम; ओमळीत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

कष्टकरी महिलांच्या कार्याला सलाम; ओमळीत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरास्त्री...