रेयान सलीम पेटकर यांची सिंगापूर आणि अमेरिकेत स्मार्ट विद्युत पावर संशोधनासाठी स्कॉलर रीसर्चर म्हणून उत्तुंग भरारी! *
👉🏻 मुंबईतील VJTI college (वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट) येथील रेयान सलीम पेटकर हे स्मार्ट पॉवर सिस्टिम्स अर्थात आधुनिक विद्युत ऊर्जा प्रणालींच्या संशोधना साठी सध्या अमेरिकेत आहेत. या आधी त्यांनी सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रतिनिधित्व केल्यानंतर त्यांनी आता अमेरिकेत संशोधन क्षेत्रात आपली वाटचाल सुरू ठेवली आहे.
रेयान यांनी 24 ते 27 ऑगस्ट 2026 दरम्यान सिंगापूरमधील मरिना बे सँड्स येथे आयोजित 18 व्या आशिया-पॅसिफिक पॉवर अँड एनर्जी इंजिनिअरिंग कॉन्फरन्स मध्ये प्रतिनिधित्व केले. या परिषदेची संकल्पना हरित तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण प्रणालींच्या माध्यमातून शाश्वत भविष्य घडविणे ही होती. विद्युत ऊर्जा प्रणालींचे नियोजन, स्मार्ट ग्रिड, सायबर सुरक्षा, नवीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा क्षेत्रातील आर्थिक धोरणे अशा विविध विषयांवर या परिषदेत भर देण्यात आला.
यानंतर रेयान सलीम पेटकर हे स्मार्ट पॉवर सिस्टिम्सच्या संशोधनासाठी अमेरिकेत पोहोचले. अमेरिकेतील मिशिगन राज्यातील हॉटन येथील मिशिगन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी येथे 11 ते 13 ऑक्टोबर 2026 दरम्यान 58 वी नॉर्थ अमेरिकन पॉवर सिम्पोजियम आयोजित करण्यात आली होती. विद्युत ऊर्जा प्रणाली आणि ऊर्जा क्षेत्रातील संशोधनासाठी ही परिषद महत्त्वाची मानली जाते.
सिंगापूर आणि अमेरिकेतील संशोधनविषयक उपक्रमांशी जोडला गेलेला रेयान यांचा प्रवास त्यांच्या शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा आहे. आधुनिक विद्युत ऊर्जा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन करण्याची त्यांची ही वाटचाल त्यांच्या कुटुंबीयांसाठी अभिमानाची बाब आहे. रेयान सलीम पेटकर यांचं शालेय शिक्षण एम.डी.नाईक इंग्लिश स्कूल रत्नागिरी येथे तर शासकीय पॉलीटेक्निक रत्नागिरी येथे इलेक्ट्रिकल डीप्लोमा झाले आहे यांच्या पुढील संशोधन कार्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त होत आहेत.. रेहान हा रत्नागिरी येथील प्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते सलीम पेटकर यांचा मुलगा असुन तो सुरवाती पासूनच एक हुशार आणि अभ्यासू विद्यार्थी म्हणून ओळखला जात असे.. रेयान च्या या कामगिरी मुळे अनेकांनी त्याचे आणि आईवडिलांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या
रेयान सलीम पेटकर यांची सिंगापूर आणि अमेरिकेत स्मार्ट विद्युत पावर संशोधनासाठी स्कॉलर रीसर्चर म्हणून उत्तुंग भरारी
