आजोबा शकील मजगांवर व वडील साबीर मजगांवकर यांचे अनेकांनी केले अभिनंदन—
पेडम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मापसा गोवा राज्य येथे नुकताच गोवा ओपन इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप
स्पर्धा पार पडली.
वर्ल्ड फुनाकोशी शोटोकान कराटे असोसिएशन यांच्या संयोजनात आणि वर्ल्ड रेनशुकान कराटेडो फेडरेशनच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये पाचशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते त्या सर्वांमध्ये मिरकर मार्शल आर्ट्स अँड फिटनेस सेंटर रत्नागिरी तसेच एम डी नाईक इंग्लिश मीडियम स्कूल रत्नागिरीचे विद्यार्थी कुमार रेहान साबीर मजगांवकर आणि कुमार सलमान साबीर मजगांवकर या दोन्ही विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळवले आहे.
कुमार रेहान साबीर मजगांवकर यांनी 14 वर्षाखालील मुलांमध्ये मार्शल आर्ट मधील काता या विभागात सुवर्णपदक पटकावले तर कुमीते या विभागात कांस्यपदक पटकावून यश मिळविले. तसेच सलमान साबीर मजगांवकर या विद्यार्थ्याने सात वर्षाखालील मुलांमध्ये मार्शल आर्ट मधील काता आणि कुमीते या दोन्ही प्रकारात सुवर्णपदक पटकावून दैदिप्यमान यश मिळवले .
त्यांच्या या यशाबद्दल मिरकर मार्शल आर्ट्स अँड फिटनेस सेंटर रत्नागिरीचे सर्वेसर्वा व दोन्ही विद्यार्थ्यांचे कोच श्री जावेद मिरकर आणि नौशीन मिरकर आणि आयान मिरकर सर तसेच एम.डी नाईक इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती शाजीया अश्फाक नाईक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समाजसेवेत अग्रेसर असणारे आणि विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांमध्ये विविध पदांवर कार्यरत असणारे श्री साबीर मजगांवकर, आणि श्री शकील मजगांवकर यांनी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन केले.
त्याचबरोबर फेडरेशनचे व टुरनामेट चे अध्यक्ष हन्शी हसन मोहंमद इस्माईल यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याच बरोबर सौ. ऐमन मजगांवकर व मजगांवकर परिवाराच्या वतीने व विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांकडून रिहान मजगांवकर आणि सलमान मजगांवकर यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
